कापूस उत्पादक पणन महासंघास २0 कोटींचे कर्ज मंजूर

By admin | Published: December 15, 2014 11:42 PM2014-12-15T23:42:28+5:302014-12-15T23:42:28+5:30

शेतक-यांच्या कापसाच्या चुका-यातील अडसर दूर.

Cotton growers approved a grant of Rs. 20 crores for the Marketing Federation | कापूस उत्पादक पणन महासंघास २0 कोटींचे कर्ज मंजूर

कापूस उत्पादक पणन महासंघास २0 कोटींचे कर्ज मंजूर

Next

खामगाव (बुलडाणा): कापूस खरेदी हंगामात खरेदी केलेल्या कापसाची रक्कम शेतकर्‍यांना अदा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाकडून कापूस उत्पादक पणन महासंघास दुराव्यापोटी २0 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. त्यामुळे सन २0१४-१५ या कापूस खरेदी हंगामासाठी राज्यातील शेतकर्‍यांच्या चुकार्‍यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
शेतकर्‍यांनी पिकविलेला कापूस हमी भावाने खरेदी केल्यानंतर या कापसाची रक्कम कापूस पणन महासंघाच्यावतीने शेतकर्‍यांना अदा करण्यात येते; मात्र निधीच्या कमतरतेमुळे शेतकर्‍यांना ही रक्कम अदा करताना विलंब होतो. त्यामुळे शेतकरी कापूस पणन महासंघाकडे कापूस विक्री करणे टाळतात. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने कापूस हंगाम २0१४-१५ मधील कापूस खरेदी योजेनेंतर्गत कापूस उत्पादक पणन महासंघाने शेतकर्‍यांकडून खरेदी करावयाच्या कापसाची हमी किंमत अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित ५0 कोटी रुपयांतून २0 कोटी रुपये इतकी रक्कम पणन महासंघास दुराव्यापोटी प्रचलित व्याज दराने कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यास महाराष्ट्र राज्य शासनाने १५ डिसेंबर रोजी मान्यता दिली आहे.

Web Title: Cotton growers approved a grant of Rs. 20 crores for the Marketing Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.