देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 12:48 AM2018-01-12T00:48:26+5:302018-01-12T01:25:55+5:30

खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते   प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.

In the country and the state 'perverted' power: Pvt. Gyanesh Waladkar | देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

देशात आणि राज्यात ‘विकृत’ सत्तेत : प्रा. ज्ञानेश वाकुडकर

Next
ठळक मुद्देलोकजागर इंडिया विधानसभेच्या २८८ जागा लढविणार!

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: केंद्रासह राज्यात सत्तेत असलेल्यांनी जनतेची ओरबडणूक चालविली असून, संघटीत धोकेबाजी करीत शेतकर्‍यांच्या, कष्टकर्‍यांच्या भावनांशी खेळणारे सत्ताधारी टपोरी आणि विकृत असल्याचा सणसणाटी आरोप लोकजागर इंडियाचे प्रणेते  प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी येथे केला.
खामगाव येथील पत्रकार भवनात आयोजित पत्र परिषदेत गुरुवारी ११ जानेवारी रोजी  प्रा. वाकुडकर यांनी लोकजागर इंडियाची भूमिका स्पष्ट केली. केंद्र आणि राज्य शासनावर सडकून टीका करताना ते म्हणाले की, देशात आणि राज्यात पूर्वी काँग्रेसच्या -राष्ट्रवादीच्या माध्यमातून  भ्रष्ट आणि बेफिकीरांचे राज्य होते. 
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जाचाला कंटाळलेल्या जनतेने पर्याय म्हणून मोदी-फडणवीस म्हणजेच भाजपला निवडूण दिले. मात्र, भाजपने शेतकरी, कष्टकरी आणि जनतेचा भ्रमनिराश केला आहे. मोदी सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपला छुपा अतिरेकी अंजेडा उघडपणे राबविला आहे. 
परिणामी, मोदींमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे फार मोठे नुकसानही झाले आहे. शेतकरी, कष्टकर्‍यांसोबतच ओबीसी विद्यार्थीही शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे अडचणीत आले असल्याचेही वाकुडकर म्हणाले.  यावेळी सध्या सत्ताधरी पक्षाच्या काही चुकीच्या धोरणांचाही त्यांनी उहापोह केला.यावेळी लोकजागर इंडियाचे महासचिव महादेव मिरगे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.  

झिरो बजेट लोकशाहीची संकल्पना साकारणार!
काँग्रेस-राष्ट्रवादी आणि भाजप-सेनेला नवा पर्याय म्हणून लोकजागर इंडियाच्या माध्यमातून तिसरा पर्याय उभा करण्याचे आपले प्रयत्न आहेत. यामध्ये विद्याथी, युवक, महिला आणि बुद्धीजीवींना उमेदवारी देत, आगामी विधानसभेच्या सर्वच २८८ जागांवर लोकजागर इंडियाचे उमेदवार उभे केले जातील. राज्यात लोकजागर इंडियाच्या माध्यमातून टप्प्या-टप्प्याने  सात कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये झीरो बजेट लोकशाही आणि गाव तिथे उद्योग ही दोन कलमं त्यांनी गुरुवारी जाहीर केली. तर उर्वरीत पाच कलमे एप्रिलपर्यंत जाहीर करणार असल्याचे प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांनी स्पष्ट केले. 
 

Web Title: In the country and the state 'perverted' power: Pvt. Gyanesh Waladkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.