दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 03:37 PM2020-01-03T15:37:15+5:302020-01-03T15:37:20+5:30
हिरा ग्रुप आॅफ कंपनीविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सागवन येथील एका दाम्पत्याची १८ लाखाने फसवणूक झाल्याचे आणखी एक प्रकरण गुरूवारी उघडकीस आले. याप्रकरणी हैदराबाद येथील हिरा ग्रुप आॅफ कंपनीविरूद्ध बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हैदराबाद येथील हिरा ग्रुप आॅफ कंपनीने गुंतवणूकदारांना आश्वासनाप्रमाणे केलेल्या गुंतवणूकीचा परतावा न देता गुंतवणूकदारांची लाखो रूपयांची फसवणूक केली आहे. याबाबत शेख नईम शेख अब्दुल रहीम (रा. सागवन) यांनी बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नोहेरा शेख (हैदराबाद) व शेख निजाम हाफीज (रा. तेलगु नगर, बुलडाणा) यांनी कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी वारंवार आमिष दाखविले. कंपनीने शेख नईम व शेख अब्दूल यांच्यासह त्यांच्या पत्नीकडून १८ लक्ष रूपयांची गुंतवणूक करवून घेतली. आश्वासनाप्रमाणे परतावा न देता आर्थिक फसवणूक केली. या तक्रारीवरून बुलडाणा शहर पोलीस स्टेशनला हिरा कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ व अपर पोलीस अधिक्षक संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक डी. बी. तडवी करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)