अंनिसकडून न्यायालयाचा अवमान; निव्वळ पब्लिसिटी स्टंट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:23 AM2017-09-12T00:23:35+5:302017-09-12T00:24:45+5:30
विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून, साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करू नये, असा मनाई हुकूम २00१ मध्ये अकोल्याच्या सहदिवाणी न्यायाधीशांनी दिला आहे. त्या आदेशाचे उल्लंघन अंनिसचे श्याम मानव व त्यांचे सहकारी करत असून, हा प्रकार म्हणजे न्यायालयाचा अवमान असून, साहित्य संमेलनाच्या तोंडावर निव्वळ पब्लिसिटी मिळविण्याचा खटाटोप असल्याचे प्रत्युत्तर विवेकानंद आश्रमाचे मुख्य प्रवक्ते तथा सचिव संतोष गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन दिले.
९१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन हिवरा आश्रम येथे आयोजित करणे निश्चित झाल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समि तीने आयोजक विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष शुकदास महाराज यांच्यावर आरोप केले. त्या आरोपांना विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी उत्तर दिले. पत्रकार परिषदेत संतोष गोरे म्हणाले, की कोट्यवधी व्याधीग्रस्तांना अँलोपॅथीसारख्या अतिउच्च चिकित्सापद्ध तीद्वारे व्याधीमुक्त करणारे कुशल शुकदास महाराज यांनी आ पले जीवन व्यतीत केले. त्यांनी कधीही कुणाचे शोषण केले नाही, फसवणूक केली नाही. धर्माच्या नावाने अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. वेदान्त आणि विज्ञान यांची सांगड घालून त्यांनी आरोग्य, दीन-दलित, पीडितांची सेवा, कृषीविकास, शिक्षण, अध्यात्म आणि सेवा या क्षेत्रात डोंगराएवढे काम उभे केले. विवेकानंद आश्रमाच्या रूपाने या क्षेत्रात संस्थात्मक काम केले जात असून, दरिद्री, पीडित, रोगी, हेच आमचे देव आहेत. या देवाची सेवा करणे हाच महाराजांनी घालून दिलेला आमच्या पुढचा आदर्श आहे. त्याच आदर्शावर पूज्यनीय महाराजांनी वाटचाल केली. संस् था त्याच आदर्शावर वाटचाल करत आहे, असा विश्वासही गोरे यांनी व्यक्त केला.
पुढे ते म्हणाले, की सहदिवाणी न्यायाधीश, अकोला यांनी १५ डिसेंबर २00१ च्या विवेकानंद आश्रमाच्या याचिकेवरील निकालात ठळकपणे शुकदास महाराज अथवा विवेकानंद आश्रमाविरोधात कोणत्याही हेतूने, कोणत्याही माध्यमांद्वारे बदनामीकारक वक्तव्ये करू नये, असा मनाई हुकूम जारी केलेला आहे. यापूवीर्ही दोन वेळा आपण अशाप्रकारे पूज्यनीय महाराजांवर चिखलफेक करणारे, त्यांचे चारित्र्यहनन करणारे आरोप केले आहेत. या आरोपांना आ पणाकडून ‘भंडाफोड’ असे म्हणण्यात येत आहे. सहदिवाणी न्यायालयाचा आदेश आमच्या बाजूने अस तानाही होत असलेल्या आरोपांकडे आम्ही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आलोत; परंतु आता जेव्हा ९१ वे अखिल भार तीय साहित्य संमेलन विवेकानंद आश्रमात आयोजित करणे प्रस्तावित आहे. यावेळी करण्यात आलेले आरोप हा न्यायालयाचा अवमान असून, आपणाविरोधात न्यायालयीन अवमाननेची याचिका कोर्टात दाखल करण्यात येणार आहे, असा इशाराही गोरे यांनी दिला आहे.
अपशकून केल्यापेक्षा संमेलनाला या!
विवेकानंद आश्रम आणि साहित्यरसिक हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्मथ आहेत. श्याम मानव व त्यांच्या सहकार्यांनी चांगल्या कार्याला अपशकून करणे सोडून द्यावे. स्वत: मानव व त्यांच्या सहकार्यांना या साहित्य संमेलनाचे सहर्ष निमंत्रण देत आहोत. त्यांनी सारस्वतांच्या या प्रांगणात आणि पूज्यनीय शुकदास महाराजांच्या तपोभूमीत आवर्जुन यावे, साहित्यरसिकता अनुभवावी, असेही संतोष गोरे म्हणाले.