जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती

By admin | Published: July 11, 2017 12:01 AM2017-07-11T00:01:46+5:302017-07-11T00:01:46+5:30

चिखली येथे तांदळाचा ट्रक पकडण्याचे प्रकरण

The court's stay on the proceedings of the District Collector | जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईला न्यायालयाची स्थगिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : शेलुद येथे पकडलेल्या तांदळाच्या ट्रकप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला जबाबदार धरुन सुरु केलेल्या कारवाईला नागपूर उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. याप्रकरणी पुढील सुनावणी १४ जुलै रोजी होणार आहे.
भारतीय खाद्य निगमच्या खामगाव गोदामातून अमडापूर गोदामासाठी निघालेला ट्रक क्रमांक एम.एच.१९ झेड २०९७ मध्ये ३५० कट्टे तांदूळ होता. अमडापूर येथील गोदामात साठा करण्यासाठी जागा नसल्याने हा ट्रक चिखली गोदामात वळता करण्यात आला. अमडापूर- चिखली दरम्यान गोदामात पोचण्यापूर्वीच हा ट्रक शेलुद ग्रामस्थांनी संशयावरून अडवला. यावेळी मारहाणीच्या धाकाने क्लिनर पळून गेला. त्याचवेळी चिखली पोलिसांनी ट्रकमालकावर गुन्हे दाखल करुन अटक केली. याप्रकरणी तहसीलदार यांच्या तक्रारीवरून वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्या मालकावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी धान्य अपहाराचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी पुलकुंडकर यांनी वाहतूक कंत्राटदार श्रीनाथ ट्रान्सपोर्ट यांना करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कारवाई करण्यासाठी २३ जून रोजी कारणे दाखवा नोटिस बजावली. दरम्यान, शासकीय दस्तवेजासह स्पष्टीकरण सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी विनंती श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण सादर करण्यास अल्प मुदत देत याप्रकरणी चौकशी करण्यासाठी निवडणूक उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांची समिती गठित केली. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी श्रीनाथ ट्रान्सपोर्टच्यावतीने नागपूर न्यायालयात कारणे दाखवा नोटिससह कारवाईला स्थगिती मिळण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली. ती दाखल करून घेत न्यायालयाने ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी यांच्या कारवाईला स्थगिती दिली. सोबतच ट्रकमालकाची जामिनावर मुक्तता केली.

Web Title: The court's stay on the proceedings of the District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.