बुलडाणा जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 12:52 PM2021-02-22T12:52:36+5:302021-02-22T12:52:36+5:30

Covid Care Center in Buldana संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहेत.

Covid Care Center in Buldana district re-opened | बुलडाणा जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत

बुलडाणा जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १४ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात झपाट्याने वाढत असून, ती जवळपास दुपटीपेक्षा अधिक झाल्याने संभाव्य परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत करण्यात येत आहे. दरम्यान, बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालयातच १०० बेडचे एक सुसज्ज असे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले असून, त्या ठिकाणी पूर्वीच्या कर्मचाऱ्यांपैकी ३३ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परिणामी जिल्हा प्रशासाने कोरोनाची कथितस्तरावरील ही दुसरी लाट अधिक गांभीर्याने घेत उपायययोजनांना प्रारंभ केला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती दिवसातून दोनदा जिल्ह्यांतील एकंदरित स्थितीचा आढावा घेत आहे. दरम्यान, नवीन कोविड सेंटर कार्यान्वीत करण्यात येत असल्याने जिल्ह्यात ३,३५५ बेड सध्या उपलब्ध झाले आहेत.


तीन ठिकाणी सुविधा वाढविल्या
बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय, खामगाव आणि शेगाव येथील डिस्टीक कोविड केअर हॉस्पिटलमधील आरोग्यविषयक सुविधाही वाढविण्यात आल्या असून, आयसीयूसह ऑक्सिजन बेडची संख्याही येथे वाढविण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.

Web Title: Covid Care Center in Buldana district re-opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.