कोरोना बाधितांच्या उपचारासाठी कोविड केअर सेंटर पुन्हा कार्यान्वीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:22 AM2021-02-22T04:22:40+5:302021-02-22T04:22:40+5:30
परिणामी जिल्हा प्रशासाने कोरोनाची कथितस्तरावरील ही दुसरी लाट अधिक गांभीर्याने घेत उपायययोजनांना प्रारंभ केला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती ...
परिणामी जिल्हा प्रशासाने कोरोनाची कथितस्तरावरील ही दुसरी लाट अधिक गांभीर्याने घेत उपायययोजनांना प्रारंभ केला आहे. दुसरीकडे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती दिवसातून दोनदा जिल्ह्यांतील एकंदरित स्थितीचा आढावा घेत आहे. दरम्यान, नवीन कोविड सेंटर कार्यान्वीत करण्यात येत असल्याने जिल्ह्यात ३,३५५ बेड सध्या उपलब्ध झाले आहेत.
--आधी बंद केले होते काही सेंटर--
ज्या कोविड केअर सेंटरमध्ये २५ टक्क्यांपेक्षा कमी कोरोनाबाधित रुग्ण आहेत, असे कोविड केअर सेंटर मधल्या काळात रुग्णांची संख्या घटल्याने बंद करण्यात आले होते. मात्र, आता कोरानाची बाधितांची वाढती संख्या व वेगाने होणारे संक्रमण पाहता कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येत आहेत. आधी काही कोविड केअर सेंटर बंद करून १३ केंद्रच सुरू ठेवण्यात आले होते.
--तीन ठिकाणी सुविधा वाढविल्या--
बुलडाणा येथील कोविड समर्पित रुग्णालय, खामगाव आणि शेगाव येथील डिस्टीक कोविड केअर हॉस्पिटलमधील आरोग्यविषयक सुविधाही वाढविण्यात आल्या असून, आयसीयूसह ऑक्सिजन बेडची संख्याही येथे वाढविण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागातील सूत्रांनी दिली.