कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:22 AM2021-06-21T04:22:56+5:302021-06-21T04:22:56+5:30
बुलडाणा येथील समर्पित कोविड रुग्णालयासमोर काही काळ या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत नंतर दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. यामध्ये ...
बुलडाणा येथील समर्पित कोविड रुग्णालयासमोर काही काळ या कर्मचाऱ्यांनी निदर्शने करत नंतर दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज केले. यामध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई, प्रशांत ठेंग, डॉ. ऋषिकेश देशमुख, पुष्कर शिंदे, पवन एकडे, शे. इमरान, संदीप भालेराव, दयानंद गवई, निखिल चाफेकर, डॉ. अक्षय आखरे, डॉ. स्नेहा मोरे यांच्यासह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते. सोबतच कोविड कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.
बीड येथील घटनेचा जिल्हा अध्यक्ष अमोलकुमार गवई यांच्या नेतृत्वात निषेध करण्यात आला़ तसेच बुलडाणा जिल्ह्यातील सर्व कोविड सेंटर ,स्त्री रुग्णालय बुलडाणा , गर्ल्स होस्टेल बुलडाणा , अपंग विद्यालय सेंटर बुलडाणा , खामगाव , चिखली , मोताळा , दे .राजा ,मलकापूर , नांदुरा , लोणार , मेहकर, शेगाव , संग्रामपूर , जळगाव , हिवरा आश्रम, जामोद ,सि. राजा, लोणार आदी ठिकाणी काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले़