कोविड लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:36 AM2021-04-02T04:36:21+5:302021-04-02T04:36:21+5:30
माेताळा: तालुक्यातील शेलापूर आणि परिसरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी शेलापूर आणि परिसरातील नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद ...
माेताळा: तालुक्यातील शेलापूर आणि परिसरात ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण शुक्रवारी करण्यात आले. यावेळी शेलापूर आणि परिसरातील नागरिकांनी लसीकरणाला प्रतिसाद दिला.
---
रक्तदान शिबिरात २२ युवकांचे रक्तदान
बुलडाणा: येथील संघर्ष ग्रुपच्या वतीने लोकनेते राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबिरात २२ युवकांनी रक्तदान केले.
----
जिल्ह्यात कोविड इंजेक्शनचा तुटवडा
मेहकर: बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी, कोविड-१९ आजारावर उपचारासाठी लागणाऱ्या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अचानक मागणी वाढल्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा झाला असल्याचे चित्र आहे.
----
कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
बुलडाणा: कोरोना संसर्ग कालावधीत कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई केली जात आहे.
-----
केमिस्ट असोसिएशनकडून कोरोना चाचणी
बुलडाणा: बुलडाणा जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या वतीने दोन दिवसीय कोरोना चाचणी शिबीर बुलडाणा येथे घेण्यात आले. नटराज गार्डन समोरील केमिस्ट भवनात आयोजित या शिबिरात ३०० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.
---
किराणा व्यावसायिकांची कोरोना चाचणी
बुलडाणा: शहरातील किराणा आणि किरकोळ व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. गत आठवडाभरात ६४५ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. व्यावसायिकांनी या तपासणी शिबिराला प्रतिसाद दिला.
---
मोफत कोरोना तपासणीला मुदतवाढ
बुलडाणा: कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून मोफत कोरोना तपासणी केली जात आहे. कोरोना आजारावर नियत्रंण मिळविण्यासाठी मोफत कोरोना चाचणीला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
---
गृहमंत्र्यांची बदनामी करणाऱ्यांचा निषेध
बुलडाणा: राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची बदनामी करणाऱ्यांचा राष्ट्रवादी सोशल मीडिया सेलच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलीप पाटील यांनी निवेदन सादर केले.
---
मासरूळ येथे मास्क वितरण
बुलडाणा: तालुक्यातील मासरूळ येथील कोरोना योध्दा यांना गुरूवारी मास्कचे वितरण करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून मास्कचे वितरण करण्यात आले.
------
गोरगरिबांना आर्थिक मदत द्या!
सिंदखेडराजा: तालुक्यातील गोरगरीब आणि दुर्बल घटकांतील नागरिकांना कोरोना कालावधीत आर्थिक मदत देण्याची मागणी अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संघटनेने शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
---------
शिवाजी महाराजांना अभिवादन
मोताळा: तालुक्यातील माकोडी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराजांना शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी युवकांनी कोविड विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्याचा संकल्प केला.
-----