कोविड लसीकरण करून घ्यावे : तहसीलदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:20 AM2021-03-29T04:20:28+5:302021-03-29T04:20:28+5:30

लोणार : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी ...

Covid should be vaccinated: Tehsildar | कोविड लसीकरण करून घ्यावे : तहसीलदार

कोविड लसीकरण करून घ्यावे : तहसीलदार

Next

लोणार : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधासाठी कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार सैपन नदाफ यांनी केले.

कोरोना आजाच्या उद्रेकानंतर लस येण्यापूर्वी कोरोना रुग्णाना उपचार करणे एवढेच यंत्रणेच्या हातात होते. मात्र, आता कोरोना प्रतिबंधक लस प्रत्येक नागरिकाला देऊन या कोरोनाचा नायनाट होऊ शकतो. ही मोठी उपलब्धी आहे. मात्र. सामान्य जनतेकडून कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळत असल्याने तालुका प्रशासनाकडून कोविड लसीकरण जनजागृती केली जात आहे. लसीकरणातील प्रतिसाद वाढविण्यासाठी तहसील प्रशासनाकडून जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत तहसीलदार सैपन नदाफ, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, डॉ. फिरोज शहा, डॉ. भास्कर मापारी, तलाठी सचिन शेवाळे, अशोक निचंग इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी भर उन्हात जनजागृती रॅली काढून जनतेस कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे कळकळीचे आवाहन केले.

Web Title: Covid should be vaccinated: Tehsildar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.