कोविड लसीकरण: माहिती देऊनही अ‍ॅपमध्ये नावांचा समावेश नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 11:31 AM2021-02-20T11:31:34+5:302021-02-20T11:31:49+5:30

Corona Vaccine कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश अजूनही अ‍ॅपमध्ये झाला नाही.

Covid Vaccination: Names are not included in the cowin app despite providing information! | कोविड लसीकरण: माहिती देऊनही अ‍ॅपमध्ये नावांचा समावेश नाही!

कोविड लसीकरण: माहिती देऊनही अ‍ॅपमध्ये नावांचा समावेश नाही!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यात कोविड लसीकरणाला सुरुवात होऊन महिनाभराचा कालावधी लोटला असून, अद्यापही २० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये समाविष्ट झाली नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. 
सूत्रांच्या माहितीनुसार, कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड असून, अनेक कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश अजूनही अ‍ॅपमध्ये झाला नाही. त्यामुळे पात्र असूनही यादीत नाव नसल्याने लस मिळू शकली नाही, अशी खंत आरोग्य कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.
कोविड लसीला मान्यता मिळाल्यानंतर ही लस सर्वप्रथम वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या फ्रंटलाईन कर्मचात्यांना समर्पित करण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेच्या पहिल्याच टप्प्यात याच कर्मचान्यांना लस दिली जात आहे. 
तत्पूर्वी आरोग्य विभागातील सर्वच पात्र कर्मचाऱ्या कोविन अ‍ॅपमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यासाठी कर्मचाºयांकडून माहितीदेखील मागविण्यात आली होती. 
लसीकरणाला सुरुवात होऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला; मात्र अजूनही जवळपास २० टक्के कर्मचाºयांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये समाविष्ट झालेली नाहीत. त्यामुळे अद्यापही या कर्मचाºयांना लस मिळू शकली नाही. 
जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून यामध्ये आरोग्य विभागातील कर्मचाºयांचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत इतरांसोबतच उर्वरित आरोग्य कर्मचाºयांना लस मिळणे अपेक्षित आहे.
२० दिवसांपासून कोविन अ‍ॅपचा गोंधळ कोविड लसीकरण मोहिमेसाठी उपयोगात आणल्या जाणाचा कोविन अ‍ॅपमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती आहे. 
मागील २० दिवसांपासून ही तांत्रिक अडचण सुरु असल्याची माहिती आहे. कोविन लसीसाठी पात्र ठरल्यानंतर या कर्मचाºयांनी त्यांची माहिती संबंधित यंत्रणेला दिली. परंतु, लसीकरणाच्या लाभार्थी यादीत अद्यापही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला नसल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. 


आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढला कोविडचा धोका 
जिल्ह्यात कोविड रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही आरोग्य विभागातील कर्मचारी रुग्णसेवा देत आहेत. असे असतानाही आतापर्यंत अनेकजणांना लस मिळाली नाही. त्यामुळे अशा कर्मचायांसाठी कोरोनाचा धोका अधिक वाढल्याचे चित्र दिसून येते.


खामगावातील निमा सदस्य वंचित!
खामगाव शहरातील राष्ट्रीय एकीकृत मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी कोविड-१९ लसीकरणासाठी नगर परिषद रूग्णालयाकडे नावे नोंदविली. नगर परिषद रूग्णालयाकडून ही नावे जिल्हा स्तरावर पाठविण्यात आलीत. मात्र, महिना लोटल्यानंतर देखील निमाच्या सदस्यांची नावे कोविन अ‍ॅपमध्ये  समाविष्ट झाली नसल्याचे समजते.

Web Title: Covid Vaccination: Names are not included in the cowin app despite providing information!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.