खामगाव येथे कोविड लसीकरण थांबले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:07 PM2021-04-13T12:07:37+5:302021-04-13T12:07:47+5:30
Covid vaccination stopped at Khamgaon : आता खामगावमध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : खामगाव येथे लसीचे सर्व डोस संपले असून त्यामुळे लसीकरण बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता खामगावमध्ये लसीचा पुरवठा पुन्हा सुरू होईपर्यंत लसीकरण बंद राहणार आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सर्व व्यक्तींचे कोविड-१९ लसीकरणाची मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रामध्ये सुरु करण्यात आली.
जास्तीत जास्त लोकांची नोंदणी व लसीकरण व्हावे यासाठी प्रशासनामार्फत व्यापक नियोजन करण्यात आले. कोविड लसीकरणात खामगाव तालुक्याची आगेकूच असतानाच लसीचा साठा संपला. त्यामुळे खामगाव तालुक्यातील सर्वच लसीकरण केंद्रावरील लसीकरण प्रभावित झाले आहे. सद्यस्थितीत लसीचा साठा संपलेला असल्यामुळे उद्यापासून लसीचा साठा उपलब्ध होईपर्यंत लसीकरण मोहीम थांबवावी लागत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
पुरवठा सुरू झाल्यानंतर पुन्हा लसीकरण
खामगाव तालुक्यातील लसीकरणासाठी लसींची मागणी नोंदविण्यात आली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत २४००० हजार लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर या लसींचे सर्वच केंद्रावर वितरण केले जाईल. त्यानंतर लसीकरण सुरळीत करण्यात येईल.