गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

By ब्रह्मानंद जाधव | Published: April 23, 2023 04:49 PM2023-04-23T16:49:35+5:302023-04-23T16:50:52+5:30

ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

cowshed fire caused a loss of rs 1 lakh soybean and wheat were burnt along with agricultural materials | गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

googlenewsNext

ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा, डोणगाव: गोठ्याला आग लागून एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना मेहकर तालुक्यातील मादणी येथे २३ एप्रिल रोजी दुपारी घडली. यामध्ये शेती उपयोगी साहित्यासह इतर काही सोयाबीन व गुरांचा चारा जळून खाक झाला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.

मादणी येथील इंदिराबाई कुशीबा मेटांगळे यांच्या घरासमोर त्यांच्या मालकीचा गोठा आहे. या गोठ्यात शेती उपयोगी साहित्य तसेच इंधन, वैरण ठेवलेली होती. २३ एप्रिल रोजी दुपारच्या दरम्यान या गोठ्याला अचानक आग लागली. आगीचे लोट पाहता आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेतली. मिळेल त्याठिकाणावरून पाणी आणायला सुरू केली. बोअरवेल सुरु करून आग आटोक्यात आणली. वेळी आग आटोक्यात आल्याने परिसरातील घरांचे होणारे नुकसान टळले. घटनेची माहीती मिळताच तलाठी अनुप नरोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या आगीत इंदराबाई कुशेबा मेटांगळे यांच्या गोठ्यात असलेले स्पिंक्लर सेट (किंमत ३० हजार रुपये), तीन पोते हरभरा दाळवं (१३ हजार रुपये), दोन पोते सोयाबीन (१० हजार रुपये), लसन १० कट्टे (३० हजार रुपये), १५ टिन पत्रे, एक ट्राली सोयाबीन कुटार असे एकूण १ लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: cowshed fire caused a loss of rs 1 lakh soybean and wheat were burnt along with agricultural materials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग