क्रेन विहिरीत पडून चालकाचा जागीच मृत्यू
By admin | Published: March 7, 2017 02:50 AM2017-03-07T02:50:00+5:302017-03-07T02:50:00+5:30
क्रेन विहिरीत पडल्याने चालक शेख करीम शेख वजीर याचा मृत्यू झाला; तर तीन मजूर गंभीर जखमी झाले.
धामणगाव बढे (जि. बुलडाणा), दि. ६- येथील सैयद रफीक सैयद सरदार यांच्या शेतामध्ये नवीन विहिरीचे खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी क्रेन विहिरीत पडल्याने चालक शेख करीम शेख वजीर याचा मृत्यू झाला; तर तीन मजूर गंभीर जखमी झाले.
धामणगाव बढे परिसरातील निमखल्ली शिवारामधील गट नं.३७ मध्ये नवीन विहिरीचे खोदाम सुरू असताना अचानक क्रेन ५0 फूट खोल विहिरीमध्ये पडली. क्रेनचालक शेख करीम शेख वजीर क्रेनसहीत ५0 फूट विहिरीमध्ये पडला.
त्याच्या अंगावर क्रेनच्या मागच्या बाजूचे मोठे-मोठे दगड व क्रेनचे इंजीन पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. तसेच विष्णू बंसी सुरडकर, वसंता गजानन गिरी, सोपान पाटील जखमी झाले. हे तिघेही विहिरीमध्ये काम करताना क्रेन विहिरीत पडत असल्याचे लक्षात येताच मजुरांनी विहिरींच्या काठाचा आसरा घेतल्यामुळे जीवित हानी टळली. जखमींना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे हलविण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी बुलडाणा येथे रवाना केले.