फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 12:20 AM2017-09-16T00:20:39+5:302017-09-16T00:21:36+5:30

 फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील  विश्‍वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी  देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य  शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला  आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे.  जिल्ह्यातही ७२0 ठिकाणी फुटबॉल खेळल्या जात आहे.  फुटबॉल खेळून या खेळामध्ये जिल्ह्याचे नाव खेळाडूंनी  रोशन करावे, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर  यांनी शुक्रवारी केले.

Create an atmosphere for football promotion! | फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा!

फुटबॉलच्या प्रचारासाठी वातावरण निर्मिती करा!

Next
ठळक मुद्देपालकमंत्री फुंडकर यांचे आवाहन राज्य शासनाने सुरू केला महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम 

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव:  फुटबॉल या खेळाचा १७ वर्षांआतील  विश्‍वचषक भारतात होणार आहे. या खेळाच्या प्रचारासाठी  देशात फुटबॉलमय वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य  शासनाने महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रम सुरू केला  आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर फुटबॉल खेळल्या जात आहे.  जिल्ह्यातही ७२0 ठिकाणी फुटबॉल खेळल्या जात आहे.  फुटबॉल खेळून या खेळामध्ये जिल्ह्याचे नाव खेळाडूंनी  रोशन करावे, असे आवाहन पालकमंत्री पांडुरंग फुंडकर  यांनी शुक्रवारी केले.
खामगाव येथील अंजुमन हास्कूल व कनिष्ठ महाविद्यालया तील सभागृहात फुटबॉल फेस्टिव्हल उपक्रमाचा शुभारंभ  करण्यात आला. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार  आकाश फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डावरे, जिल्हा क्रीडा  अधिकारी शेखर पाटील, तहसीलदार सुनील पाटील,  अंजुमन हायस्कूलचे अध्यक्ष डॉ. वकारा खलील,  महाविद्यालयाचे प्राचार्य सय्यद मुनीन, तालुका क्रीडा  अधिकारी अनिल इंगळे आदी उपस्थित होते.
जागतिक फुटबॉल स्पर्धेचे काही सामने राज्यात होणार  असल्याचे सांगत पालकमंत्री  फुंडकर म्हणाले, हे सामने  मुंबईत होणार आहेत. सदर सामने पाहण्यासाठी खामगावा तील खेळाडूंना पास मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या जागतिक स्पर्धेमुळे देशात फुटबॉल खेळ वाढीस लागणार  आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर या खेळात देशाचे नाव रोशन  करून आपल्या नावाचा लौकिक वाढवावा, असे  आवाहनही पालकमंत्री यांनी केले. यावेळी आमदार आकाश  फुंडकर यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, मुलांनी  मैदानी खेळ खेळावेत. टीव्ही, मोबाइल यांच्या अतिरेकामुळे  मैदानी खेळांचे प्रमाण कमी झाले आहे. फुटबॉल हा मैदानी व  सांघिक खेळ आहे. याप्रसंगी कुडो खेळात जागतिक स्पर्धेत  मार्शल आर्ट प्राप्त यश राजेश सोनोने, सताऊल्लाखा जहीर  उल्ला खान यांचा सत्कार करण्यात आला.  प्रास्ताविक  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले. आभार    इंगळे यांनी मानले. 
कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विविध खेळांचे प्रशिक्षक, विद्यार्थी  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
-

Web Title: Create an atmosphere for football promotion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.