मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:32 AM2021-03-24T04:32:51+5:302021-03-24T04:32:51+5:30

मेहकर येथे इमामवाडा येथे राहत असलेले अहमद नूर कुरेशी शेख जलील यांच्या ताब्यातील जागा भाड्याने न घेण्यावरून अहमद नूर ...

Crime against three in assault case | मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

Next

मेहकर येथे इमामवाडा येथे राहत असलेले अहमद नूर कुरेशी शेख जलील यांच्या ताब्यातील जागा भाड्याने न घेण्यावरून अहमद नूर कुरेशी शेख जलील यांचे नातलग मुजीब हसन अब्दुल हबीब, त्यांचा मुलगा मुजाहिद हसन मुजीब हसन हे अहमद नूर कुरेशी शेख जलील यांचे हात पकडून त्यास मारहाण करीत हाेते. एहमन हसन हसीब हसन यांनी पाठीमागून येऊन अहमद नूर कुरेशी शेख जलील यांच्या पाठीत चाकू मारून गंभीर जखमी केले. तसेच त्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणावरून मेहकर पोलिसांनी मुजीब हसन अब्दुल हबीब, मुजाहिद हसन मुजीब हसन व एहमन हसन हसिब हसन ( सर्व राहणार मेहकर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक जायभाये, भास्कर सानप तपास करीत आहे.

Web Title: Crime against three in assault case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.