महिलेस विष पाजल्याप्रकरणी गुन्हा!
By admin | Published: November 6, 2016 02:05 AM2016-11-06T02:05:13+5:302016-11-06T02:05:13+5:30
बाळापूर येथील घटना.
बाळापूर, दि. ५- पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव खुर्द येथील एका आदिवासी कुटुंबातील महिलेला जागेच्या वादातून विष पाजल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोरेगाव येथील सविता चव्हाण यांनी बाळापूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ग्रामपंचायतकडून आपल्या जागा देण्यात आली आहे. या जागेवरून शेजारी आपल्याशी वाद घालतात. असाच वाद घालून ३ नोव्हेंबर रोजी मणकर्णा तुळशीराम मुंढे, संतोष तुळशीराम मुंढे, संजय तुळशीराम मुंढे, वासुदेव सुलताने, ओंकार सुलताने, तुळशीराम मुंढे आदींनी मला विष जबरदस्तीने पाजले. या प्रकरणी सविता चव्हाण यांच्या जबानी रिपोर्टवरून पाचही जणांविरुद्ध कलम ३0७,३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार एफ.सी. मिर्झा यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर येथील सहा. पोलीस निरीक्षक ममताबादे करीत आहे.