स्मशानभूमीतील साहित्याची चोरी व नासधूस प्रकरणी गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:44 AM2021-02-25T04:44:53+5:302021-02-25T04:44:53+5:30
स्थानिक राऊतवाडीतील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३६ लाख ...
स्थानिक राऊतवाडीतील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी नगराध्यक्षा प्रिया कुणाल बोंद्रे यांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३६ लाख रूपयांचा विकास निधी मंजूर केला आहे तर सदर स्मशानभूमीच्या देखभाल, दुरुस्तीची व देखरेखीची संपूर्ण जबाबदारी राष्ट्रमाता जिजाऊ अर्बनने स्वीकारली आहे. दरम्यान नगराध्यक्षा बोंद्रे यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून स्मशानभूमीत बांधकाम, सरणावर शेड व इतर विकास कामे सुरू असताना रात्रीच्यावेळी बांधकामाचे साहित्य, लोखंड आदी साहित्य सातत्याने चोरीला जात होते. त्यात सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी स्मशानभूतील साहित्य चोरून नेण्यासह तीन शेड उद्धवस्त करून टाकले आहे. या प्रकाराने शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याची दखल घेत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांच्या सूचनेवरून पालिकेचे स्थापत्य अभियंता श्रीपाद प्रल्हाद भालेराव यांनी २४ फेब्रुवारी रोजी चिखली पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीतील चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलीस करीत आहेत.