Crime: सायबर भामट्याने केली विद्यार्थिनीची ९९ हजाराने फसवणूक

By भगवान वानखेडे | Published: March 24, 2023 08:08 PM2023-03-24T20:08:47+5:302023-03-24T20:09:18+5:30

Cyber Crime: पाच रुपये पाठविणाऱ्या विद्यार्थिनीच्या खात्यातून ९९ हजार लंपास झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Crime: Cyber scammer cheated a student for 99 thousand | Crime: सायबर भामट्याने केली विद्यार्थिनीची ९९ हजाराने फसवणूक

Crime: सायबर भामट्याने केली विद्यार्थिनीची ९९ हजाराने फसवणूक

googlenewsNext

- भगवान वानखेडे
बुलढाणा : डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनी टॅबच्या कव्हरसाठी ऑनलाइन ऑर्डर केली. केलेली आर्डर कुठपर्यंत आहे हे पाहण्यासाठी वेबसाइटवरील मोबाइल क्रमांकावर फोन करुन विचारले असता सायबर भामट्याने लिंक पाठवून वैयक्तिक माहिती भरा, आणि पाच रुपये पाठविण्याचे सांगितले. ही प्रोसेस पूर्ण करुन पाच रुपये पाठविणाऱ्या विद्यार्थिनीच्या खात्यातून ९९ हजार लंपास झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये २४ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात आर्थिक फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. अशातच २४ मार्च रोजी देऊळगाव राजा येथील सरस्वती सोनुने (४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची मुलगी मागील काही वर्षापासून युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे ती काही दिवसांपासून देऊळगाव राजा येथे राहत आहे. दरम्यान १ मार्च रोजी तिने टॅबची कव्हर ऑनलाइन ऑर्डर केली होती. ३ मार्च रोजी केलेली ऑर्डर कुठपर्यंत आली यासाठी क्लाउड बस या वेबसाइटवरील मोबाइल क्रमांकावर फोन केला असता अज्ञाताने विद्यार्थिनीच्या व्हाटसअपवर लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगून सोबतच ५ रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविण्याची प्रोसेस सांगतिली. तक्रारदार महिलेच्या मुलीने पाच रुपये पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशी ४ मार्च रोजी एकवेली ९६ हजार ७८५ रुपये तर दुसऱ्यावेळी ३२०० रुपये असे एकुण ९९ हजार २८५ रुपये खात्यातून लंपास झाले. याप्रकरणी दिलेल्या तक्रारीवरुन सायबर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करीत आहेत.

Web Title: Crime: Cyber scammer cheated a student for 99 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.