Crime News: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी! आॅटोचे सायलेंसर कापताना पोलिसांनी चोरट्यास रंगेहात पकडले

By अनिल गवई | Published: October 8, 2022 04:30 PM2022-10-08T16:30:09+5:302022-10-08T16:30:34+5:30

Crime News: पोलीसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचे सायलेंसर कापून नेत असताना एका चोरट्यास रंगेहात पकडण्यात आले. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात घडली.

Crime News: Theft in the premises of rural police station! The police caught the thief red-handed while cutting the silencer of the car | Crime News: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी! आॅटोचे सायलेंसर कापताना पोलिसांनी चोरट्यास रंगेहात पकडले

Crime News: ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारातच चोरी! आॅटोचे सायलेंसर कापताना पोलिसांनी चोरट्यास रंगेहात पकडले

Next

- अनिल गवई 
 खामगाव -  पोलीसांनी एका गुन्ह्यात जप्त केलेल्या वाहनाचे सायलेंसर कापून नेत असताना एका चोरट्यास रंगेहात पकडण्यात आले. ही घटना ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आवारात घडली. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलीसांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी चोरट्यास पकडले. त्याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खामगाव येथील इंदिरा देशमुख नगर रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशन आहे.  या पोलीस स्टेशनच्या आवारात एका गुन्ह्यात पोलीसांनी एमएच २८ बी ९७८९ या क्रमांकाचा आॅटो जप्त केला आहे. या आॅटोचे सायलेंसर भीमराव शंकरराव काळे (७५, रा. बुध्द विहाराजवळ, शंकर नगर, खामगाव) हा इसम लोखंडी करवतीने कापून नेत होता. ही घटना पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या पोकॉ  गोविंद इंगळे यांच्या निदर्शनास पडली. त्यांनी ताबडतोब त्यांचे सहकारीसंजय सदांशिव, पोकॉ शुध्दोधन गवारगुरू, संजय काकडे यांच्या मदतीने आरोपीला रंगेहात पकडले. त्याच्या जवळून ०४ नग लोखंडी एक्सा ब्लेड, एक पिशवी जप्त केली. याप्रकरणी गोविंद इंगळे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भीमराव काळे विरोधात भादंवि कलम ३७९, ५११ गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Crime News: Theft in the premises of rural police station! The police caught the thief red-handed while cutting the silencer of the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.