Crime News: डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर
By निलेश जोशी | Updated: December 17, 2022 16:34 IST2022-12-17T16:33:44+5:302022-12-17T16:34:11+5:30
Crime News: औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथून काही काळासाठी सैलानी येथे वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय महिलेची भडगाव शिवारात हत्या केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवाशी व सैलानीत वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते यास पोलिसांनी अटक केली आहे.

Crime News: डोक्यात दगड घालून महिलेची हत्या, आरोपी अटकेत, धक्कादायक कारण आलं समोर
- नीलेश जोशी
बुलढाणा - औरंगाबाद जिल्ह्यातील सुलतानपूर येथून काही काळासाठी सैलानी येथे वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय महिलेची भडगाव शिवारात हत्या केल्याप्रकरणी परभणी जिल्ह्यातील साडेगाव येथील रहिवाशी व सैलानीत वास्तव्यास असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते यास पोलिसांनी अटक केली आहे.
भडगाव शिवारात १४ डिसेंबर रोजी लता कोतकर या महिलेचा डोक्यात दगड टाकून खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. प्रकरणी रायपूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी मृत महिलेचा मुलगा विलास मुरलीधर कोतकर याने रायपूर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला होता. प्रकरणाच्या तपासात पोलिसांना लता कोतकर या महिलेला परभणी जिल्ह्यातील परंतु सैलानी येथे राहत असलेल्या बाळासाहेब मुंजाजी बारहते याने सरपण आणण्याच्या बहाण्याने भडगाव शिवारात नेले हाेते. तेथे जुन्या वादातून त्याने लता कोतकर यांची डोक्यात कुऱ्हाड घालून व नंतर दगडाने डोके ठेचून खून केल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करत बाळासाहेब बारहते यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास ठाणेदार राजवंत आठवले यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलिस हेडकॉन्स्टेबल शांताराम जाधव, नायक पोलिस कॉन्स्टेबल श्रीकांत चिटवार, सहायक पोलिस निरीक्षक अमेल बारापात्रे, नायक पोलिस कॉन्स्टेबल अमोल गवई व अन्य सहकाऱ्यांनी केला होता.
१६ डिसेंबरला आरोपीस घेतले ताब्यात
या प्रकरणात बाळासाहेब बारहते यास १६ डिसेंबर रोजी रात्रीच पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली. बाळासाहेब आणि लता कोतकर यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग डोक्यात ठेवून त्याने लता कोतकर यांना भडगाव जंगलात लाकडे आणण्याच्या बहाण्याने नेले होते. तेथे त्याने तिची हत्या केली. अप्पर पोलिस अधीक्षक बीबी महामुनी, एसडीपीअेा सचिन कदम यांनीही या प्रकरणात तपासात रायपूर पोलिसांना मार्गदर्शन केल्याची माहिती ठाणेदार राजवंत आठवले यांनी दिली.