आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या छळवणुकीभोवतीच फिरते गुन्हेगारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:40 AM2021-09-17T04:40:58+5:302021-09-17T04:40:58+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे जरी असले ...

Crime revolves around financial fraud and harassment of women | आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या छळवणुकीभोवतीच फिरते गुन्हेगारी

आर्थिक फसवणूक आणि महिलांच्या छळवणुकीभोवतीच फिरते गुन्हेगारी

googlenewsNext

बुलडाणा : जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलिसांकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. असे जरी असले तरी जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांच्या कालावधीत घडलेल्या गुन्ह्यांनी लक्ष वेधले आहे. यामध्ये आर्थिक फसवणूक आणि महिलांची छळवणूक याच दोन गुन्ह्याभोवती जिल्ह्याची गुन्हेगारी फिरत असल्याची माहिती समोर येत आहे. तेव्हा जिल्हा पोलिसांसमोर पुन्हा एका गुन्हेगारी कमी करण्याचे आव्हान आहे.

तेरा तालुक्यांचा जिल्हा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ३४ पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. अत्याधुनिक सोई-सुविधा आणि आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध असलेल्या बुलडाणा जिल्हा पोलिसांसमोर वाढत्या गुन्हेगारीचे आव्हान उभे ठाकले आहे. सुरू वर्षातील आठ महिन्यांत गुन्हेगारीचा घेतलेल्या आढाव्यात जिल्ह्याची गुन्हेगारी इतर बाबींच्या तुलनेत आर्थिक फसवणूक आणि महिलांची छळवणूक हे गुन्हे रोखण्यासाठी बुलडाणा पोलीस प्रयत्न करताना दिसत आहेत.

अशी आहे गुन्ह्याची आकडेवारी (ऑगस्टपर्यंत)

प्रकार संख्या तपास टक्केवारी

अत्याचार ७४ ७३ ९९

फसवणूक ५२ ३१ ६०

विनयभंग २८६ २८४ ९९

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी आर्थिक फसवणूक झाली कमी

२०२० या वर्षातील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांत आर्थिक फसवणुकीचे एकूण ६७ गुन्हे घडले होते. यामध्ये ४० प्रकरणाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले होते. तर याच वर्षी ५४ अत्याचाराच्या घटना आणि २७८ विनयभंगाच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये अत्याचाराच्या सर्वच गुन्ह्याची उकल करण्यात आली होती. तर विनयभंगाच्या २७८ गुन्ह्यापैकी २७६ गुन्ह्यांची उकल करण्यात आली होती. यंदा मात्र, आर्थिक फसणुकीचे ५२ गुन्हे घडले असून, ३१ प्रकरणाचा तपास करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी ६० टक्के एवढी आहे.

गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश

जिल्ह्यात महिलांवर होणारे अत्याचार आणि आर्थिक फसवणूक या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात बुलडाणा पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आल्याचे दिसून येते. अत्याचार, विनयभंगाच्या घटनांच्या तपासाची टक्केवारी ९९ टक्के असून, महिलांनी भीती बाळगू नये असे आवाहन बुलडाणा पोलिसांनी केले आहे.

Web Title: Crime revolves around financial fraud and harassment of women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.