विनापरवाना सैलानी बाबाचा संदल काढल्याप्रकरणी १०११ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:36 AM2021-04-04T04:36:05+5:302021-04-04T04:36:05+5:30

तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाचा संदल २ एप्रिलला रात्री काढण्यात आला. प्रशासनाची परवानगी नसताना बेकायदेशीर पिंपळगाव सराई ...

Crimes against 1011 people for removing unlicensed tourist Baba's sandal | विनापरवाना सैलानी बाबाचा संदल काढल्याप्रकरणी १०११ जणांवर गुन्हे

विनापरवाना सैलानी बाबाचा संदल काढल्याप्रकरणी १०११ जणांवर गुन्हे

Next

तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानी बाबाचा संदल २ एप्रिलला रात्री काढण्यात आला. प्रशासनाची परवानगी नसताना बेकायदेशीर पिंपळगाव सराई गावातून संदल काढल्यामुळे भाविकांची गर्दी झाली. त्यामुळे शासनाच्या नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांच्या तक्रारीवरून रायपुर पोलीस स्टेशनमध्ये १ हजार ११ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये आरोपी शेख रफिक शेख करीम, शेख शफीक शेख करीम हाजी हाशम शेख हबीब शेख नजीर शेख कासम शेख चांद शेख हबीब शेख कदीर शेख नईम शेख असलम शेख जहीर शेख राजू शेख शहजाद यांच्यासह एक हजार अज्ञात व्यक्तींविरुद्ध रायपूर पोलीस स्टेशनला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१, महाराष्ट्र कोविड १९ चे नियम ११ तसेच विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास बुलडाणा पोलीस अधीक्षक चावरीया, रायपूर ठाणेदार सुभाष दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे हे करीत आहेत.

Web Title: Crimes against 1011 people for removing unlicensed tourist Baba's sandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.