जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांविरोधात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 12:04 PM2021-02-17T12:04:02+5:302021-02-17T12:04:13+5:30
Buldhana News उपनिबंधकांना आंदोलनकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून चार जणांविरोधात बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : अवसायनात गेलेल्या जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या साखर विक्रीतून कामगारांची थकीत देणी देण्यात यावीत, या मागणीसाठी १५ फेब्रुवारी पासून सुरू असलेले आंदोलन १६ फेब्रुवारी रोजीही सुरू होते. दरम्यान, कामगारांच्या थकबाकीवरून जिल्हा उपनिबंधकांना आंदोलनकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याच्या कारणावरून चार जणांविरोधात बुलडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात स्वत: जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून बुलडाणा शहर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कारखान्याच्या कामगारांची देणीही थकलेली आहेत. ती मिळावी यासाठीसाखर कारखान्यातील कामगारांनी १५ फेब्रुवारीपासून जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. , मंगळवारी कामगारांची व कारखान्याचे अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांच्यामध्ये चर्चा चालू असताना त्यांना धक्काबुकी झाल्याने त्यांनी थेट पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आंदोलन कर्त्यांचे सहकारी राजन चौधरी, उत्तम जाधव, विनायक देशमुख, दिलीप कटारे अन्य व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केले.