...तर असामाजिक तत्वांना थेट न्यायालयीन कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 03:28 PM2018-09-14T15:28:13+5:302018-09-14T15:28:38+5:30

criminal elements directly judicial custody | ...तर असामाजिक तत्वांना थेट न्यायालयीन कोठडी 

...तर असामाजिक तत्वांना थेट न्यायालयीन कोठडी 

Next

- निलेश जोशी 

बुलडाणा : गणेशोत्वादरम्यान असामाजिक तत्वे डोके वर काढण्याची शक्यता पाहता, अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना किमान १५ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत (प्रतिबंधात्मक कारवाई) पाठविण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलिस दल प्रयत्न करीत आहे. त्यासंदर्भात भारतीय दंड संहितेतील कलम १५१-३ चा आधार घेण्यात येत आहे. दरम्यान न्यायिकस्तरावर मात्र पोलिसांना ही बाब प्रथमत: सिद्ध करावी लागणार असल्याने पोलिसांनी त्यानुषंगाने जिल्ह्यातील अशा जवळपास १०० गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा डाटाबेस तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. थोड्याबहुत फरकाने एमपीडीएसारखीच ही छोटेखानी कारवाई आहे. सध्याच्या सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था आबाधीत राहण्याच्या दृष्टीकोणातून नव्याने जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हा पोलिस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांनी ही भूमिका घेऊन पोलिस स्टेशनस्तरावर त्यासंदर्भात सुचना निर्गमीत केलेल्या आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत पोलिस प्रशासन पोलिस उपनिरीक्षक आणि पोलिस निरीक्षक यांना कायद्याने प्रदान केलेल्या अधिकारातंर्गत १५१ (१) अंतर्गत संशयितांना किमान २४ तासासाठी अटकाव करत होते. या कलमातंर्गत कारवाई केल्यानंतर एसडीएम कोर्टातून संबंधितांना कायदा व सुव्यवस्था तथा शांतता भंग होणार नाही असे हमी पत्र दिल्यानंतर त्यांना जामीन मिळत मिळतो. मात्र अनेकता हमीपत्र देऊनही अनेकांकडून गुन्हेगारी कृत्ये घडत आहेत. परिणामस्वरुप जिल्हा पोलिस दलाने आता भारतीय दंड संहितेच्या कलम १५१ (३) चा त्यासाठी आश्रय घेण्याचे ठरविले आहे. त्यात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे संबंधित गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना हजर करून त्यांच्या गुन्ह्याची जंत्रीच मांडण्यात येऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचा पोलिसांचा मानस आहे.

हमीपत्र देऊनही गुन्हे करणारे रडारवर

दखलपात्र गुन्हा किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल अशा स्वरुपाचे कृत्य एखाद्या व्यक्तीकडून किंवा काही व्यक्तीकडून होण्याची शक्यता पोलिस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी ते वरिष्ठ अधिकार्यांना वाटत असल्यास अशा व्यक्तीला भारतीय दंडसंहितेच्या कलम १५१ (१) अंतर्गत २४ तासासाठी अटकाव करता येतो. अशांना १५१-२ अंतर्गत सोडून देण्याचे ठाणेदारांना अधिकार आहे. सोबतच सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्यांना कलम ११६ (३), १०७ अंतर्गत तालुका दंडाधिकार्यांकडे हमीपत्र देऊन जामीन दिला जातो. मात्र त्याउपरही अशांकडून दखलपात्र गुन्हे किंवा जिल्हाधिकार्यांचा जमावबंदी आदेशाचे संबंधिताकंडून उल्लंख होत असल्यास त्यांच्या पूर्वइतिहासाची जंत्री गोळाकरून अशांना थेट प्रथमवर्ग न्यायदंडाधिकार्यांसमोर उभे करून १५ दिवसांची न्यायिक कोठडी मिळविण्याचा प्रयत्न केला जातो.

जिल्ह्यात अशी कारवाई अपवादात्मकच

बुलडाणा जिल्ह्यात अशा प्रकारची कारवाई ही फारच अपवादात्मक स्थितीत केल्या गेली आहे. मात्र यंदा जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने बनविलेल्या कृती आराखड्यातंर्गत कलम १५१ (३) अंतर्गत वारंवार हमीपत्राचा भंग करून गुन्हे करणार्यांवर तथा सार्वजनिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणार्यांवर अशी कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी स्वीकारली आहे. बुलडाणा पोलिस ठाण्यातंर्गत जवळपास आठ जणांवर कारवाई करण्याचे प्रस्तावीत आहे.

सण उत्सव काळात कायदा सुव्यवस्था अबाधीत रहावी, यासाठी बनविण्यात आलेल्या कृती आराखड्यातंर्गत अशी कारवाई प्रस्तावीत करण्यात आली असून त्या दृष्टीने पोलिस प्रशासन सध्या प्रयत्नरत आहे.

- दिलीप पाटील भुजबळ, पोलिस अधीक्षक, बुलडाणा

Web Title: criminal elements directly judicial custody

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.