खामगावात ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 03:58 PM2020-07-10T15:58:46+5:302020-07-10T15:59:30+5:30

नियमांचे पालन न करणाºया ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

Criminal offenses against 45 drivers in Khamgaon | खामगावात ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे 

खामगावात ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगावा : कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत नियमांचे पालन न करणाºया ४५ वाहन चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.  अनलॉक नंतर सव्वा महिन्याच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली. विनाकारण बाहेर फिरणाºयांवर कारवाईसाठी पोलिसांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही मोहिम राबविली. दरम्यान, याच कालावधीत मोटार वाहन कायद्यानुसार ३२०० जणांवर दंडात्मक कारवाई करीत पोलिस प्रशासनाने सहा लक्ष ४०० रुपयांच्या दंडाची वसुली केली. हे येथे उल्लेखनिय!
खामगावपासून नजीकच असलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाचे थैमान आहे. अकोला कनेक्शनमुळे खामगाव शहरात कोरोना विषाणूचे संक्रमण वाढले आहे. खामगाव शहराला आता कोरोनाच्या समूह संक्रमणाचा धोका वाढीस लागला आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने नियमांचे पालन न करणाºयांविरोधात आॅपरेशन आॅलआऊट ही मोहिम राबविण्यास सुरूवात केली आहे. या कालावधीत मोटार वाहन कायद्यासोबतच फौजदारी स्वरूपाच्या कारवाई देखील करण्यात येत आहेत.
  अनलॉक कालावधीत सर्वत्र कारवाईची मोहीम थंडावली असताना, खामगाव शहर पोलिसांनी धडक मोहिम राबविली. १ जून ते ९ जुलैपर्यंत ४५ जणांवर फौजदारी कारवाई करण्यात आली. यामध्ये भादंवि कलम १८८, २६९, २७०, साथरोग अधिनियम (३), आपत्ती व्यवस्थापन कायदा (५१),  आणि महाराष्ट्र कोविड नियमावली नियम ११ अन्वये कारवाई करण्यात आली.
 पोलिसांच्या या कारवाईमुळे सामान्यांना तसेच गरजूंना त्रास होणार नाही, याचीही खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे.
 
३२०० वाहन धारकांकडून सहा लाखांवर दंड वसूल!
अनलॉक कालावधीत खामगाव शहरात ३२०० वाहन धारकांवर मोटार वाहन कायद्यातंर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून सहा लाख ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
 फौजदारी कारवाईमध्ये ०६ (चारचाकी वाहने), ०७  (तीनचाकी वाहने) तर ३२ दुचाकी धारकांचा समावेश आहे. एका कारमध्ये ८ जण बसलेले आढळून आल्याने ही कार जप्त करण्यात आली. कोणताही दबाव झुगारत कारवाई करण्यात येत असल्याने मोठ्याप्रमाणात दंडात्मक वसुली होतेय.
 
पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कारवाईत कोणताही अतिरेक होत नाही.खामगाव शहर हे कोरोना विषाणूच्या समूह संक्रमणाच्या उंबरठ्यावर असून प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. या वर्षात भौतिक सुखाच्या आहारी न जाता आपल्या गरजा मर्यादित ठेवत प्रत्येकाने नियमांचे पालन करावे. पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे.
-सुनिल अंबुलकर
पोलिस निरिक्षक,खामगाव

Web Title: Criminal offenses against 45 drivers in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.