बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात झाले सक्रीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:03 PM2020-11-28T17:03:44+5:302020-11-28T17:03:53+5:30

विशेष म्हणजे यामधील एक आरोपी खिसेकापू आहे तर एक आरोपी हा सोन साखळी चोरणारा आहे.

Criminals in Beed district active in Buldana district | बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात झाले सक्रीय

बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात झाले सक्रीय

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: बीड जिल्ह्यातील गुन्हेगार बुलडाणा जिल्ह्यात सक्रीय झाले असल्याचे सध्या चित्र असून गेल्या दहा दिवसात बीड जिल्ह्यातील दोन चोरट्यांना बुलडाणा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारावर अटक केल्याने हे वास्तव समोर येत आहे. विशेष म्हणजे यामधील एक आरोपी खिसेकापू आहे तर एक आरोपी हा सोन साखळी चोरणारा आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काही परस्पर संबंध आहेत का? याचाही सध्या स्थानिक गुन्हे शाखा तपास करत आहेत. विशेष म्हणजे खिसेकापू असलेल्या  अेामप्रकाश उर्फ उमेश मुरलीधर गवळी (रा. नळवंडी नाका, राजूनगर, बीड) याने बुलडाणा, खामगाव आणि चिखली येथे गुन्हे केले असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेने थेट परळी येथे छापा टाकून २६ नोव्हेंबरलाच अटक केलेला अैालाद हुसैन जावेद हुसैन जाफरी उर्फ रोशन हा सोन साखळी चोर आहे. दहा दिवसांच्या अंतराने या दोघांना अटक करण्यात आल्याने बुलडाणा जिल्ह्यात परजिल्ह्यातील चोरटे सक्रीय असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यातील तीन चोरटे हे अैारंगाबाद जिल्ह्यात कार चोरी प्रकरणात अटक झाले आहे.   मराठवाड्याच्या सीमे लगतच्या धाड परिसरातील हे रहिवाशी आहे. त्यामुळे बीड, बुलडाणा, अैारंगाबाद जिल्हा एक प्रकारे गुन्हे करण्याचे या आरोपींचे कार्यक्षेत्र असल्याचे समोर येत आहे. 


अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
बीड जिल्ह्यातून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्रसंगी आंतरजिल्हास्तरावर गुन्हे करण्यात येत असावे असा पोलिसांचा कयास आहे. त्यामुळे पोलिस तपासात त्यांच्याकडून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बुलडाणा जिल्ह्यातील धाड परिसरात राहणाऱ्या व चिखली येथून अटक करण्यात आलेल्या बाप लेकांच्या टोळीचेही आंतरराज्यस्तरावर कार चोरीच्या प्रकरणात संबंध असावे असा कयास  अैारंगाबाद ग्रामीण पोलिसांनी पोलिसांना आहे. त्यांच्या चौकशीत बऱ्याच बाबी समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Criminals in Beed district active in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.