महाशिवरात्रीच्या उत्सवावर कोरोनाचे संकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:02 AM2021-03-13T05:02:24+5:302021-03-13T05:02:24+5:30
महाशिवरात्रीच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिसरातील अनेक ठिकाणी शिव मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संपूर्ण कार्यक्रम स्थगित ...
महाशिवरात्रीच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परिसरातील अनेक ठिकाणी शिव मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी संपूर्ण कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. शिवमंदिराच्या ठिकाणी पारायण, सप्ताह, ग्रंथवाचन, शिव पिंडीला अभिषेक, शिव पूजा काही ठिकाणी महाशिवरात्रि निमित्ताने शिव मंदिराला यात्रेचे स्वरूप येते. दुसरबीड येथील सिंगनाथ लिंग देवखेड येथील हेमाडपंती शिव मंदिर आहे. त्याचप्रमाणे केशव शिवणी येथे अतिशय रम्य ठिकाणी व तलावाच्या कडेला डोंगराच्या कुशीत मुर्डेश्वर महादेव मंदिर आहे. गावकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने या मंदिराची देखभाल करण्याकरिता सेवेकऱ्याची नियुक्ती केली आहे. आज महाशिवरात्रीच्या महापर्वावर शिवाचा अभिषेक करणे, महादेवाचे दर्शन घेणे व महाशिवरात्रि निमित्ताने उपवास करून शिवलीलामृत पारायण येथे केले जाते. परंतू भाविकांनी याठिकाणी सर्व नियमांचे पालन करून दर्शन घेतले. अनेक कार्यक्रम, यात्रा रद्द झाल्याने भाविकांचा हिरमोड झाला. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण शिव मंदिरांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळला.