बुलडाणा जिल्ह्यात ५२७ शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 06:46 PM2020-06-29T18:46:41+5:302020-06-29T18:48:06+5:30
जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: जिल्ह्यात सरासरी ७० टक्के खरीपाची पेरणी पूर्ण झाली आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. ६१७ हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन उगवलेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ५२७ शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. सोयाबीन उगवले नसल्याची तक्रार केलेल्या शेतकºयांच्या बांधावर जाऊन कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत.
मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर खरीप हंगामाची पेरणी केल्यानंतर चांगले उत्पादन मिळते. परंतू दरवर्षी पाऊस लांबत असल्याने मृग नक्षत्रातील पेरणीचा मुहूर्त हुकत. बेभरवश्याच्या या पावसाचा शेतकºयांना दरवेळी फटका बसतो. यंदा मृग नक्षत्रात पाऊस झाल्याने बहुतांश शेतकºयांनी पेरणी उरकली. कित्येक वर्षानंतर मृगात पेरणी झाल्याने शेतकºयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतू पावसाने पाठ फिरवल्याने शेतकºयांच्या आनंदावर विरजण पडले. पावसाची दांडी, त्यात बोगस बियाण्यांचा फटका असे दुहेरी संकट शेतकºयांवर निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सध्या ७० टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यामध्ये २ लाख ६३ हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. परंतू यंदा बोगस बियाण्यांमुळे, तर कुठे पाऊस न झाल्याने सोयाबीन उगवलेच नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. २९ जूनपर्यंत सोयाबीन न उगवल्याच्या ५२७ शेतकºयांच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. ७१७ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचे बियाणे उगवलले नाही. कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या तालुकास्तरीय समित्यांच्या माध्यमातून शेतकºयांच्या तक्रारीनंतर पंचनामे करण्यात येत आहेत. ज्या कंपन्या शेतकºयांसाठी सहकार्याची भूमिका ठेवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधिषक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक यांनी दिली.