अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान; ३००० पंचनामे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2020 11:53 AM2020-09-03T11:53:56+5:302020-09-03T11:54:17+5:30
तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आॅगस्टमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील ४,२७१ शेतकऱ्यांच्या शेतजमीनीचे नुकसान झाले असून खरडून गेलेल्या शेत जमीनीपैकी जवळपास ९०० शेतकऱ्यांच्या शेत नुकसानाचे पंचनामे आतापर्यंत कृषी विभागाच्या सहाय्याने पीक विमा कंपनीने केले असले तरी अद्यापही जवळपास तीन हजार शेतकºयांच्या शेती नुकसानाचे पंचनामे बाकी असल्याचे वास्तव समोर आले आहे.
त्यातच जुन, जुलै आणि आॅगस्ट महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टी तथा जोरदार पावसामुळे २४ हजार ३५९.७६ हेक्टरवरील पिकांचे तथा शेत जमीचे शेतकºयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान एकट्या आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसामुळे पीक विमा काढलेल्या ४, २७१ शेतकºयांच्या झालेल्या नुकसानापैकी प्रत्यक्षाक विमा कंपनीने कृषी विभागाच्या सहाकार्याने ९०० पेक्षा अधिक शेतकºयांच्या नुकसााचा पंचनामा केला आहे.
त्यामुळे अद्यापही तीन हजार शेतकºयांच्या नुकसानाचे पंचनामे बाकी आहे. १९ ते २० आॅगस्ट दरम्यान, बुलडाणा, चिखली, संग्रामपूर, मेहकर, लोणार, देऊळगाव राजा तालुक्यातील १५९ गावातील या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. चालू आर्थिक वर्षात या शेतकºयांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांना येत्या काळात नुकसानापोटी भरपाई मिळण्याचे निश्चित झाले असले तरी प्रत्यक्षात पंचनामे करण्याचा वेग मंद आहे. आज जवळपास १२ दिवस झाले तरी प्रत्यक्षा या पैकी दोनतृतीयांश शेतकºयांच्या पीक नुकसानाचे पंचनामे अद्याप बाकी आहे. त्यामुळे त्याला वेग देण्याची गरज शेतकºयांशी चर्चा केल्यानंतर समोर आली आहे.