कृषी विभागाकडून परिसरातील पिकांची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 01:41 PM2018-08-20T13:41:52+5:302018-08-20T13:42:08+5:30
कपाशी व इतर पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असल्याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दखल घेतली. तसेच नायगाव दत्तापूर परिसरातील पिकांची पाहणी केली.
नायगाव दत्तापूर : मागील वर्षी बोंडअळीमुळे कपाशीचे नुकसान झाले होते. यावर्षी काही शेतकºयांनी कपाशीची पेरणी केली आहे. कपाशी व इतर पिकांवर रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत असल्याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी विभागाच्या अधिकाºयांनी तत्काळ दखल घेतली. तसेच नायगाव दत्तापूर परिसरातील पिकांची पाहणी केली. कृषी पर्यवेक्षक रमेश सुरजुशे, कृषी सहाय्यक गणेश निगुडे यांनी नायगाव दत्तापूर येथील आसाराम निकम यांच्या शेतातील फळ धारणा व बोंडी लागण्याच्या अवस्थेत असलेल्या कपाशीची पाहणी करुन उपाययोजना करण्यासाठी शेतकºयाला मार्गदर्शन केले. कपाशीच्या शेतात प्रामुख्याने फेरोमन ट्रॅप लावणे गरजेचे आहे. सध्या कपाशी पिकाला बोंडअळीचे सावट पसरले आहे. यासोबत फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी यासह रसशोषण करणाºया किडींचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. अशा वेळेस शेतकºयांनी कुठलीही महागडे व चुकीच्या औषधांचा वापर करु नये. कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच कापूस पिकाचे व्यवस्थापन केल्यास उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी फायदा होईल. अशी माहिती कृषी विभागामार्फत शेतकºयांना देण्यात आली. (वार्ताहर) कोट... शेतकºयांनी कपाशीवरील गुलाबी बोंंडअळीला घाबरून न जाता निरीक्षण करून कृषी विभागाचा सल्ला घेवूनच समोरील उपाय योजना करावी. -गणेश निगुडे कृषी सेवक, नायगाव दत्तापूर
मागच्या वर्षी झालेल्या कपाशी पिकाचे नुकसान पाहता याही वर्षी कपाशी पिकाची भिती मनात पसरत आहे. उत्पादना अगोदरच खिसा खाली होत आहे. किडीमुळे कपाशी पिकावरचा विश्वास उडत आहे.
- आसाराम निकम शेतकरी, नायगाव दत्तापूर