देऊळगाव मही येथे पीक पाहणी कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:31 AM2021-08-01T04:31:48+5:302021-08-01T04:31:48+5:30

जिल्हा मासिक चर्चासत्र कार्यक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनोद खडसे, डॉ. वाय. व्ही. ...

Crop inspection program at Deulgaon Mahi | देऊळगाव मही येथे पीक पाहणी कार्यक्रम

देऊळगाव मही येथे पीक पाहणी कार्यक्रम

Next

जिल्हा मासिक चर्चासत्र कार्यक्रमासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विनोद खडसे, डॉ. वाय. व्ही. इंगळे, सहायक प्राध्यापक, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोला, डॉ. पी.के. राठोड यांच्यासह विजय बेतीवार, कृषी उपसंचालक, बुलडाणा, अनंता झोडे, तंत्र अधिकारी, बुलडाणा, तालुका कृषी अधिकारी आर.के. मासळकर, मंडळ कृषी अधिकारी सतीश दांडगे, रवी राठोड हे अधिकारी उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठे जयंतीदिनी व्याख्यानमालेचे आयाेजन

चिखली : साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त १ ते ८ ऑगस्ट पर्यंत आभासी पद्धतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ८ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ७ वाजता लाईव्ह व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून या दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

सीईटी झाल्यावरच अकरावीचे होणार प्रवेश

बुलडाणा : अकरावी प्रवेशासाठी सीईटी आवश्यक आहे. त्यामुळे जोपर्यंत सीईटी प्रक्रिया पार पडत नाही, तोपर्यंत कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु करता येणार नाही, असे स्पष्ट आदेश माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे सीईटी होण्यापूर्वी कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयाला अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजू केंद्रे यांचा सत्कार

साखरखेर्डा : लोणार तालुक्यातील पिंपरी खंदारे येथील शेतकरी राजू केंद्रे हे ब्रिटिश सरकारकडून दिल्या जाणाऱ्या चेव्हेनिंग या प्रतिष्ठेच्या स्कॉलरशिपचे मानकरी ठरले आहेत. बुलडाणा अर्बन विभाग मेहकरचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांनी राजू केंद्रे यांचे पिंप्री खंदारे येथील राहत्या घरी जाऊन त्यांचे वडील आत्माराम केंद्रे व आई जिजाबाई केंद्रे यांचा सत्कार केला.

जांभरुण रस्त्यावरुन दुचाकी लंपास

बुलडाणा : शहरातील बसस्थानक परिसराला लागून असलेल्या जांभरुण मार्गावरुन २७ जुलै रोजी दुपारी दुचाकी लंपास झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मयूर रामेश्वर पवार यांनी आपली दुचाकी एम.एच.२८ ए ४४२८ हॉटेलच्या बाहेर ठेवली हाेती. ती अज्ञात चाेरट्यांनी लंपास केली़

जिल्ह्यातील १२ गावे तहानलेली

बुलडाणा : भर पावसाळ्याच्या दिवसांत जिल्ह्यातील बारा गावे अजूनही तहानलेली आहेत. या गावातील हजारो नागरिकांची तहान भागवण्यासाठी १३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यासोबतच प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाईवर उपाययोजना म्हणून १२१ गावांसाठी १३८ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

दहा तालुक्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा

बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर, लोणार व सिंदखेडराजा तालुके वगळता उर्वरित दहा तालुक्यांमध्ये अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या तालुक्यातील अनेक गावांना पाणीटंचाईची झळ सहन करावी लागणार आहे़

Web Title: Crop inspection program at Deulgaon Mahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.