पीक कर्जवाटपाचे बँकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:23 AM2021-06-21T04:23:02+5:302021-06-21T04:23:02+5:30

यंदा पीक कर्जवाटपाचे उद्दिष्टच कमी झाल्यामुळे बँकांकडून उद्दिष्टपूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होण्याची गरज आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती ...

Crop lending challenge to banks | पीक कर्जवाटपाचे बँकांसमोर आव्हान

पीक कर्जवाटपाचे बँकांसमोर आव्हान

Next

यंदा पीक कर्जवाटपाचे उद्दिष्टच कमी झाल्यामुळे बँकांकडून उद्दिष्टपूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रभावी प्रयत्न होण्याची गरज आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनीही गेल्या आठवड्यात बँकांकडून नेमके किती उद्दिष्ट पूर्ण झाले, याचा आढावा घेतला होता. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे बुलडाण्यात आले असता या मुद्द्यावर त्यांनी आ. हर्षवर्धन सपकाळांसमवेत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चाही केली होती. दुसरीकडे दोन दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १५ जुलैपर्यंत बँकांनी शेतकऱ्यांना खरिपासाठीचा पीक कर्जपुरवठा करावा, असे निर्देश दिलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असता उपरोक्त बाब स्पष्ट झाली.

--२० दिवसांत १३६ कोटी वाटप--

बँकांनी पीक कर्जवाटपाचा वेग वाढविण्यासंदर्भात हालचाली कराव्यात, अशा सूचनाही अग्रणी बँकेकडून देण्यात आल्या आहेत. त्यानुषंगाने गेल्या २० दिवसांत १५ हजार १३६ शेतकऱ्यांना १३६ कोटी २४ लाख रुपयांचे बँकांनी कर्जवाटप केले आहे.

--कर्जवाटपाचा टक्का घसरतोय--

गेल्या सहा वर्षांचा विचार करता गेल्या वर्षीचा अपवाद वगळता २०१५-१६ पासून सातत्याने पीक कर्जवाटपाचा टक्का जिल्ह्यात घसरत असल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर यावर्षी पीक कर्जवाटपाचे कमी झालेले उद्दिष्ट पाहता बँकांना महत्तम पातळीवर पीक कर्जवाटप करण्याचे आव्हान आहे.

-- सहा वर्षांत वाटप झालेले पीक कर्ज--

वर्ष कर्जवाटप (टक्केवारी)

२०१५-१६ ८७.१०

२०१६-१७ ७९.३९

२०१७-१८ २६.१३

२०१८-१९ ३१.७०

२०१९-२० ५१.००

२०२०-२१ २८.४२ (२० जूनपर्यंत)

Web Title: Crop lending challenge to banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.