बुलडाणा जिल्ह्यात १४४ कोटींचे पीक कर्ज वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 02:02 PM2019-07-08T14:02:51+5:302019-07-08T14:02:55+5:30

जिल्ह्यात ८.१७ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून १८ हजार १३६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे.

Crop loan allocation of Rs. 144 crores in Buldana district | बुलडाणा जिल्ह्यात १४४ कोटींचे पीक कर्ज वाटप

बुलडाणा जिल्ह्यात १४४ कोटींचे पीक कर्ज वाटप

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत पावसाने दमदार हजेरी लावलेली असतानाच पीक कर्ज वाटपाचा टक्काही दमदार पद्धतीने वाढविण्याची गरज आहे. वर्तमान स्थितीत मात्र जिल्ह्यात ८.१७ टक्केच पीक कर्ज वाटप झाले असून १८ हजार १३६ शेतकऱ्यांना त्याचा लाभ झालेला आहे.
बुलडाणा जिल्हयातील तीन लाख ७१ हजार ७२ शेतकऱ्यांची प्रामुख्याने पीक कर्जावर मदरा आहे. त्या तुलनेत विचार करता वर्तमान स्थितीत १८ हजार १३६ शेतकºयांनाच पीक कर्ज वाटप झालेले आहे. १४४ कोटी ८३ लाख ७८ रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप झालेले आहे. यंदा जिल्ह्यात एक हजार ७७३ कोटी ७७ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. लोकसभा निवडमुकीमध्ये प्रारंभी पीक कर्ज वाटपाचा वेग काहीसा संथ गतीने होता. मात्र त्यानंतर याचा वेग वाढणे अपेक्षीत होते. मात्र जून महिन्यात प्रारंभीच्या तीन आठवडे पावसाने दडी मारल्याने शेतकºयांनी पीक कर्ज घेण्यात फारसा रस दाखवला नव्हता. मात्र त्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पीक कर्जाचा टक्का हा वाढण्यास प्रारंभ झाला. परंतू अपेक्षेप्रमाणे हे पीक कर्ज वाटप झाले नसल्याचे चित्र पाच जुलै रोजीच्या प्रत्यक्ष आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. प्रामुख्याने जिल्ह्यात आतापर्यंत सेंट्रल बँकेने दोन हजार ५५४ शेतकºयांना १७ कोटी २३ लाख ९८ हजार रुपयांचे, स्टेट बँकेने तीन हजा ७९१ शेतकºयांना २९ कोटी २५ लाख ८३ हजार, विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने दोन हजार ३९० शेतकºयांना २० कोटी ३३ लाख ४६ हजार तर जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने चार हजार ७६८ शेतकºयांना २२ कोटी ९१ लाख ५७ हजार रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. एचडीएफसी बँकेनेही ७६६ शेतकºयांना १७ कोटी ९२ लाख ९३ हजार, आयसीआयसीआय बँकेने ७५९ शेतकºयांना नऊ कोटी ६७ लाख रुपयांचे पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले आहे.

Web Title: Crop loan allocation of Rs. 144 crores in Buldana district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.