जिल्ह्यात १८२ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:26 AM2021-06-02T04:26:12+5:302021-06-02T04:26:12+5:30
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ९०४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदा मिळालेले असून, ९७ हजार ६५० शेतकऱ्यांना या बँकांना ...
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना ९०४ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यंदा मिळालेले असून, ९७ हजार ६५० शेतकऱ्यांना या बँकांना हे पीक कर्ज द्यावे लागणार आहे. त्यापैकी मे अखेर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी दहा हजार ४३६ शेतकऱ्यांना ९५ कोटी ३ लाख रुपयांचे पीक कर्जवाटप केले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना दिलेल्या एकूण उद्दिष्टाच्या ११ टक्के उद्दिष्ट गेल्या दोन महिन्यांत या बँकांनी पूर्ण केले आहे.
खासगी क्षेत्रातील बँकांना या वर्षी ४ हजार ३५० शेतकऱ्यांना ८२ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी प्रत्यक्षात बँकांनी आतापर्यंत ४७३ शेतकऱ्यांना ८ कोटी ८६ लाख २४ हजार रुपयांचे कर्जवाटप केले आहे. ग्रामीण बँकेनेही दिलेल्या उद्दिष्टाच्या १८ टक्के पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले असून, ४ हजार ५०१ शेतकऱ्यांना ४३ कोटी ९० लाख रुपयांचे पीक कर्ज दिलेले आहे.
--जिल्हा बँकेने दिले ३४ कोटीचे कर्ज--
गेल्या पाच वर्षांपूर्वी आपला बँकिंग परवाना परत मिळविण्यात यशस्वी झालेल्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेने त्यांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ४३ टक्के पीक कर्ज आतापर्यंत वाटप केले असून, ही रक्कम ३४ कोटी ७१ लाख ८८ हजारांपर्यंत जाते. जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला १३ हजार शेतकऱ्यांना ६६ कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. त्या तुलनेत दोन महिन्यांत जवळपास निम्मे पीक कर्ज जिल्हा बँकेने वाटप केलेले आहे.