पीक कर्ज; गर्दी टाळण्यासाठी जिल्हा बँकेचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 11:09 AM2020-04-25T11:09:00+5:302020-04-25T11:09:06+5:30
खरीप हंगामात ६५ कोटी रुपयांचे वाटप जवळपास १४ हजार शेतकऱ्यांना बँकेला करावयाचे आहे.
- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेला यंदा ७२ कोटी रुपयांचे पीक कर्ज खरीप व रब्बी हंगामात वाटप करण्याचे उदिष्ठ मिळाले आहे. पैकी खरीप हंगामात ६५ कोटी रुपयांचे वाटप जवळपास १४ हजार शेतकऱ्यांना बँकेला करावयाचे आहे. मात्र कोरोनाची साथ पाहता बँकांमध्ये येणाºया शेतकऱ्यांना प्रसंगी संसर्गाची लागण होण्याची शक्यता पाहता जिल्हा बँकेने शेतकºयांची गर्दी टाळण्यासाठी नियोजन हाती घेतले आहे.
जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या जिल्ह्यात ७० शाखा असून त्यापैकी ४७ शाखा या ग्रामीण भागात असून २३ शाखा या सेमी अर्बन क्षेत्रात आहे. या शाखातंर्गत येत असलेल्या कार्यकारी सोसायट्यामधील शेतकरी सभासदांना विशिष्ट दिवशी बँकामध्ये बोलूवून त्यांना कर्ज वाटप केले जाणार आहे. जेणेकरून एकदम होणारी गर्दी टाळल्या जावू शकते. सोबतच सामाजिक अंतर राखून प्रत्येक शेतकºयाचे शंका समाधान करण्यासोबतच त्यांच्या कागदपत्रांची पुर्तता करता येणे शक्य होईल, असे प्राथमिक स्तरावली बँकेचे नियोजन असल्याची माहिती जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोख खरात यांनी दिली. बँकेच्या एका शाखेतंर्गत जवळपा दहा सोसायट्या येतात. त्यापैकी प्रत्येक सोसायटीमधील शेतकºयांना एका ठरावीक दिवशी बोलावून त्यांना कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
असे आहेत पीक कर्जाचे दर
जिल्हा बँकर्स समितीने केलेल्या शिफारशीनुसार पीक कर्जाचे दरही निश्चित करण्यात आले असून नुकत्याच झालेल्या खरीप आढावा बैठकीतही त्याची माहिती देण्यात आली. यात ज्वारीसाठी ११ हजार ६०० (जिरायतसाठी १० हजार ४००), सोयाबीनसाठी १८ हजार, कापसासाठी २१ हजार ६०० (१८,५००), उदीड, मुगासाठी आठ हजार रुपये तर मक्यासाठी १३ हजार २०० (जिरायतसाठी १२ हजार रुपये) या प्रमाणे राहणार असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेतील सुत्रांनी दिली.
बँकांनाही सुचना
खरीप पीक कर्ज वाटपाबबात बँकांनाही जिल्हा अग्रणी बँकेने सुचना दिल्या असून शेतकºयांचा सातबारा, स्पॅम्प व अनुषंगीक कागदपत्रे मिळविण्यासंदर्भातही माहिती देण्यात आली असून शेतकरी वर्गाने तशा हालचाली सुरू केल्या असून काही शेतकरी बँकांमध्ये अॅप्रोच होत असल्याचेही जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी स्पष्ट केले.