कर्जमाफी मिळालेल्या ५४ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 11:23 AM2020-07-03T11:23:56+5:302020-07-03T11:24:10+5:30

तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी प्रत्यक्षात २२ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप झाले आहे.

Crop loans to 54% of farmers who have received loan waivers | कर्जमाफी मिळालेल्या ५४ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज

कर्जमाफी मिळालेल्या ५४ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कर्जमाफी मिळालेल्या जिल्ह्यातील एकुण शेतकऱ्यांपैकी ४८ टक्के शेतकºयांना आतापर्यंत खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जमाफी मिळालेल्या शेतकºयांपैकी प्रत्यक्षात ६० हजार ६३२ शेतकºयांना पीक कर्ज वाटप झाले आहे. दुसरीकडे यंदाच्या खरीप हंगामात तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट असून त्यापैकी प्रत्यक्षात २२ टक्के शेतकºयांना पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे पीक कर्ज वाटपाचा वेग आणखी वाढविण्याची गरज आहे.
विभागीय आयुक्त तीन जुलै रोजी जिल्ह्यातील एकंदरीत स्थितीचा आढावा घेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर माहिती घेतली असताही बाब समोर आली. बुलडाणा जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतंर्गत बºयाच शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण होऊ शकले नव्हते. त्यामुळे बरेच शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे समोर आले होते. प्राप्त माहितीनुसार बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख २५ हजार ७९९ शेतकºयांना ८३९ कोटी ५६ लाख २७ हजार रुपयांची कर्जमाफी मिळालेली आहे. त्यामुळे या शेतकºयांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर त्वरित पीक कर्ज उपलब्ध करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर होते. त्यानुषंगाने दोन जुलै पर्यंत कर्जमाफी मिळालेल्या या एक लाख २५ हजार ७९९ शेतकºयांपैकी ४८ टक्के अर्थात ६० हजार ६३२ शेतकºयांना पीक कर्ज वाटप झाले आहे.


आतापर्यंत ७० हजार शेतकºयांना कर्ज
यंदाच्या खरीप हंगामात तीन लाख ६२ हजार ८२८ शेतकºयांना दोन हजार ४६० कोटी ३५ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटपाचे उदिष्ट आहे. त्यापैकी ७० हजार ३१७ शेतकºयांना ५५२ कोटी ४३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे. एकूण उदिष्टाच्या १९ टक्के शेतकºयांना आतापर्यंत पीक कर्ज वाटप झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अद्यापही पीक कर्जाचा टक्का वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात निम्म्यापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Web Title: Crop loans to 54% of farmers who have received loan waivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.