शेगाव तालुक्यात पीक नुकसानाचा सर्व्हे पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:53 PM2019-11-12T12:53:47+5:302019-11-12T12:54:03+5:30
शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे.
शेगाव : परतीच्या पावसाने तालुक्यातील एकूण ४४९३८ पैकी ४०६६८ हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी ३८०७८ हेक्टर क्षेत्र बाधित ठरले असून ३५७६५ शेतकरी मदतीसाठी पात्र झाले आहेत. त्यादृष्टीने पात्र शेतकर्याच्या नावाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण जिल्ह्यात पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री ना.डॉ.संजय कुटे यांनी शासकीय यंत्रणेला दिले होते. त्यानुसार शेगाव तालुक्यात पीक नुकसानीचा १०० टक्के सर्व्हे पूर्ण झाला आहे. पावसामुळे यामध्ये सर्वच शेतकºयांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यामुळे सरसकट नुकसान दाखविण्यात आले आहे. सोयाबीन, कापूस, मका आदी पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी मोहीम स्वरूपात पूर्ण केली, विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी. सोयाबीनच्या सुड्या, पेंड्या अथवा गंजी मारून नुकसान झालेल्या पिकालाही विम्याची मदत द्यावी, तसेच एकही शेतकरी पंचनामा व लाभापासून वंचित राहता कामा नये, व सरसकट नुकसान असल्याने कुठल्याही शेतकºयाला वंचित ठेवण्यात येणार नाही असेही ना.डॉ.कुटे यांनी सांगितले होते, त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेने पंचनामे करण्याचे काम गतीने केले. (शहर प्रतिनिधी)
शेगाव तालुक्यातील सव्हेर्चे काम १०० टक्के पूर्ण केले आहे. मदतीस पात्र शेतकºयाच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.
- शिल्पाताई बोबडे,
तहसिलदार ,शेगाव