कापूस नोंदणीसाठी पीक पेऱ्याचा अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 10:48 AM2020-09-22T10:48:53+5:302020-09-22T10:49:05+5:30
चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- सदानंद सिरसाट
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची रक्कम लवकर मिळावी, यासाठी चालू वर्षात कापूस विक्रीसाठी शेतकºयांना आॅक्टोबरपूर्वीच नोंदणी करण्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यासाठी चालू वर्षाचा कापूस पीक पेºयाची नोंद आॅक्टोबरपूर्वी सात-बारावर येणे अशक्य आहे, ही अडचण पाहता नोंदणी प्रक्रीयाच अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरीप हंगामातील कापूस उत्पादक शेतकºयांना विक्रीसाठी आॅनलाइन नोंदणी करण्याचे भारतीय कापूस महामंडळाने बजावले आहे. त्यानुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये ही प्रक्रीया सुरू झाली आहे. मात्र, शेतकºयांच्या सात-बारामध्ये चालू वर्षाच्या पेरेपत्रकात कापूस पिकाच्या नोंदीची अट असल्याने नवीनच समस्या निर्माण झाली आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये खरीप पिक पाहणीचा कालावधी ३० सप्टेंबर तर काही जिल्ह्यांमध्ये १५ आक्टोंबरपर्यंत असतो. पिक पाहणीच्या याद्या ग्रामपंचायतीला जाहीर केल्या जातात. त्यानंतर खरीप पिकांची आॅनलाइन पेरेपत्रकात नोंद घेतल्या जाते. या आॅनलाइन नोंदीसाठी किमान महिनाभराचा कालावधी लागतो. त्यातच या नोंदी करताना इंटरनेट कनेक्टिव्हीटी, नेटवर्कची तांत्रिक बाब यावर कामाची गती अवलंबून असते. एकाचवेळी कापूस उत्पादक शेतकºयांनी पेरेपत्रासाठी तलाठ्यांकडे धाव घेतल्याने त्यांच्यावर कामाचा ताण वाढला आहे. तसेच वाद होण्याचे प्रकारही घडत आहेत.
कापूस उत्पादक शेतकºयांच्या नोंदणीसाठी पीकपेºयाची नोंदीसंदर्भात महसूल विभागाशी चर्चा केली जाणार आहे. त्यांच्या आदेशानुसार प्रक्रीयेत तसा बदल करता येईल.
- ओ.एस.साळुंके,
प्रशासक, कृउबास, खामगाव.