निश्चित उत्पन्नाची हमी असलेल्या पिकांची निवड करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:31 AM2021-02-05T08:31:03+5:302021-02-05T08:31:03+5:30
चिखली : पारंपरिक पिके सातत्याने तोट्यात जात आहेत. शिवाय वारंवार खर्चीक आणि बिनभरवशाची तीच ती पिके घेतली जात असल्याने ...
चिखली : पारंपरिक पिके सातत्याने तोट्यात जात आहेत. शिवाय वारंवार खर्चीक आणि बिनभरवशाची तीच ती पिके घेतली जात असल्याने खात्रीची बाजारपेठ आणि चांगल्या भावाची हमी मिळत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कमी खर्चात अधिक उत्पन्नाची हमी देणाऱ्या पिकांची निवड करावी, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले यांनी केले.
पेनटाकळी प्रकल्पात यंदा मुबलक प्रमाणात जलसाठा असल्याने प्रकल्प क्षेत्रातील गावांसह पेनसावंगी, सावरगाव, डोंगरगाव यासह इतर गावांसाठी सिंचनाची सोय झाल्याने शेतकरी आता बागायती शेतीकडे वळाला आहे. यातील काही शेतकऱ्यांनी ऊस लागवडीकडे आपला मोर्चा वळविला आहे. दरम्यान, पेनसावंगी येथील सधन शेतकरी अशोक शेजोळ यांनी यावर्षी प्रथमच ऊस लागवडीचे क्षेत्र वाढविण्याचे ठरविले असून, या वाढीव क्षेत्रातील ऊस लागवडीचा शुभारंभ आमदार श्वेता महाले यांच्या हस्ते ३१ जानेवारी रोजी करण्यात आला. आ. महाले यांनी काळ्या आईची आणि उसाच्या नवीन बेण्याचे पूजन करून लागवडीचा शुभारंभ केला.
यावेळी सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच व पोलीसपाटील गीता प्रवीण शेजोळ, विकास मोरे, संगीता अशोक शेजोळ, राधाबाई अशोक शेजोळ, गीता गणेश शेजोळ, प्रकाश शेजोळ, शोभाबाई गुलाबराव शेजोळ, बेबी वसंता शेजोळ, तेजराव शेजोळ, गजानन शेळके, संभाजी अंभोरे, दिनकर बोरकर, स्वीय सहायक सुरेश इंगळे, बंडू महाराज, रामेश्वर मोरे, गजानन शेळके श्रीराम कोरडे, प्रवीण पाटील, संदीप पाटील, कडूबा महाजन, रमेश शेजोळ, तात्या शेजोळ, भागवत शेजोळ, मधुकर कोरडे, गुलाबराव शेजोळ, अशोक शेजोळ, रामेश्वर सोनवणे, विनोद रोकडे आदी शेतकरी उपस्थित होते.
पाणंद रस्त्यांचा विकास लवकरच !
मतदारसंघात योजनाबाह्य गावजोडणी रस्ते आणि पाणंद रस्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या रस्त्यांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. सरकार जरी या रस्त्यांबाबत उदासीन असले तरी चिखली मतदारसंघातील योजनाबाह्य रस्ते योजनेत समाविष्ट करून त्यावर आणि पाणंद रस्त्यांच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असून, शासकीय निधी आणि लोकसहभागातून लवकरच पांदण रस्त्याचा विकासाचे काम हाती घेणार असल्याची माहिती आ.श्वेता महाले यांनी यावेळी दिली.