धामणगाव शिवारात बहरली पिके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:40+5:302021-07-19T04:22:40+5:30
शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर मंगळवारी व गुरुवारी सांयकाळी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले व ...
शेतकरी अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत होता. अखेर मंगळवारी व गुरुवारी सांयकाळी आकाशात काळे ढग जमा होऊ लागले व ४ वाजतापासून विजेच्या कडकडाटासह धामणगावसह परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून, खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, कपाशी आदी पिकांच्या पेरण्या झाल्या असून बऱ्याच ठिकाणी पिके चांगली आली आहेत. मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पिके सुकू लागली होती. पावसाअभावी ही पिके हातची जातात की काय, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली होती. परंतु दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसू लागला आहे. तर परिसरातील पिकांनाही जीवदान मिळाले आहे. कपाशी, सोयाबीन, मूग, मका ही पिके टवटवीत दिसू लागली आहेत. शेतशिवारातील पिके डोलू लागल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.