मुसळधार पावसामुळे पिके गेली खरडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:26 AM2021-07-17T04:26:49+5:302021-07-17T04:26:49+5:30

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या ...

Crops were damaged due to torrential rains | मुसळधार पावसामुळे पिके गेली खरडून

मुसळधार पावसामुळे पिके गेली खरडून

Next

उंद्री ते किन्ही सवडत रस्त्याची दुरवस्था

अमडापूर : उंद्री ते किन्ही सवडत, पिंप्री काेरडे रस्त्यावर गत काही दिवसांपासून माेठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. त्यामुळे वाहनधारकांना माेठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देऊन उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे.

वीजपुरवठा वारंवार खंडित, ग्रामस्थ त्रस्त

हिवरा आश्रम : परिसरात गत काही दिवसांपासून वीजपुरवठा वारंवार खंडित हाेत असल्याने, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. थाेडा जरी पाऊस आला, तरी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.

रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी

माेताळा : माेताळा फाटा ते आठवडी बाजार या रस्त्याची गत काही दिवसांपासून दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी माेठमाेठे खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे.

पावसामुळे शेतकरी सुखावला

सुलतानपूर : परिसरात गत काही दिवसांपासून दमदार पाऊस हाेत असल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने शेतकरी त्रस्त झाले हाेते. पिके सुकत असल्याने, दुबार पेरणीचे संकट काेसळले हाेते. आता पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याचा अनेकांना चावा

बुलडाणा : पिसाळलेल्या कुत्र्याने १४ जुलै रोजी अनेकांना चावा घेतला. ही घटना शहरातील जोहरनगर, इक्बालनगर या भागात दुपारच्या सुमारास घडली. परिसरात माेकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. नगरपालिकेने त्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हेात आहे.

Web Title: Crops were damaged due to torrential rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.