गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात भाविकांची गर्दी

By admin | Published: July 11, 2017 12:53 AM2017-07-11T00:53:07+5:302017-07-11T00:53:07+5:30

संतश्रेष्ठ गजानन महाराजांना अनेक भक्तांनी गुरू मानले. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्तांनी श्रींच्या मंदिरात उपस्थिती लावली होती.

The crowd of devotees in Shiga for Gurupurnime | गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेनिमित्त शेगावात भाविकांची गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : गुरुब‘म्हा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर! गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मैश्रीगुरवे नम:
संतश्रेष्ठ गजानन महाराजांना अनेक भक्तांनी गुरू मानले. त्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गुरूचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्तांनी श्रींच्या मंदिरात उपस्थिती लावली होती.
आषाढ पौर्णिमेला व्यासपौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरू या शब्दाचा अर्थच महान, मोठा असा आहे. गुरूला भेटण्यासाठी संतनगरीत दिवसभर भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली. सकाळपासून श्रींच्या समाधी दर्शनासाठी शिस्तीत श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला.
मंदिर परिसरात भक्त शिस्तीने श्रींचे दर्शन घेत होते. मंदिर परिसरातील स्वच्छताही वाख्याण्याजोगो होती. भक्तांना दर्शनवारीत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहा, विश्रांतीसाठी जागा आदी नियमित सुविधा उपलब्ध होत्या.
आनंदसागर या मनोहरी उद्यानाचे हजारो भक्तांनी अवलोकन केले. भक्तांना मंदिर व आनंदसागर हे सोईचे होत आहे. संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व आनंदसागर परिसर भक्तांनी फुलला होता. यावेळी संस्थानकडून भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

भाऊसाहेबांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन
महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री व बुलडाण्याचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी सकाळी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी गुरू एक परिवर्तन घडवून आणणारी शक्ती आहे. गुरूची कृपा असेल, तेथे विजय निश्चित आहे. गुरू-शिष्य नाते तर्कापेक्षा श्रद्धा, आस्था व भक्तीवर टिकून असल्याची प्रतिक्रिया श्रींच्या दर्शनानंतर दिली.

Web Title: The crowd of devotees in Shiga for Gurupurnime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.