अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:42 AM2021-06-09T04:42:18+5:302021-06-09T04:42:18+5:30
बुलडाणा शहरात भरला बाजार : काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन बुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने राज्य शासनाने साेमवारपासून ...
बुलडाणा शहरात भरला बाजार : काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन
बुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने राज्य शासनाने साेमवारपासून अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़ अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात नागरिकांनी खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती़ बाजारात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र हाेते़
राज्यभरात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, राज्य शासनाने पाच टप्प्यांमध्ये अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़ पाॅझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसर बुलडाणा जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला आहे़ त्यामुळे, ७ जूनपासून शहरासह ग्रामीण भागातील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़ अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य मार्गावर बाजार भरला हाेता़ गत काही महिन्यांपासून बंद असलेली दुकाने सुरू करण्यात आली हाेती़ दुसरीकडे नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र बाजारात हाेते़ काेराेना अद्याप पूर्णपणे ओसरला नसताना बाजारपेठेत हाेणारी गर्दी तिसऱ्या लाटेला आमंत्रण देणारी ठरण्याची भीती व्यक्त हाेत आहे़ जिल्ह्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या कमी झाली आहे़ मात्र, धाेका अद्यापही कायम असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे़
अनेकांना मास्कचा विसर
अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरू झाल्याने साेमवारी बाजारात नागरिकांनी गर्दी केली हाेती़ यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता़ तसेच अनेक जण विना मास्क फिरत असल्याचे चित्र हाेते़ नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे़
तिसऱ्या लाटेचा धाेका कायम
जिल्ह्यातील काेराेना रुग्णांची संख्या दरराेज कमी हाेत असली तरी तिसऱ्या लाटेचा धाेका कायम आहे़ त्यामुळे, नागरिकांनी काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याची गरज आहे़ नगरपालिका व पाेलीस प्रशासनाने अनलाॅक प्रक्रिया सुरू हाेताच कारवाई बंद केली आहे़ मात्र, तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता कारवाईसाठी पथके तैनात करण्याची गरज आहे़
व्यावसायिकांना दिलासा
काेराेना संसर्ग वाढल्यामुळे केशकर्तनालये, ब्युटी पार्लर तसेच जीवनाश्यक वस्तू व्यतिरिक्त दुकानेही बंद करण्यात आली हाेती़ त्यामुळे, व्यावसायिकांवर माेठे आर्थिक संकट काेळसले हाेते़ अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरू करण्यात आल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे़ या दुकानांवर काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आव्हान राहणार आहे़