बुलडाणा शहरात अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 11:13 AM2021-06-08T11:13:38+5:302021-06-08T11:13:45+5:30

Buldana Unlock : अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात नागरिकांनी खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती़. 

Crowds erupted in Buldana on the first day of the unlock | बुलडाणा शहरात अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

बुलडाणा शहरात अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत असल्याने राज्य शासनाने साेमवारपासून अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़. अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी बुलडाणा शहरात नागरिकांनी खरेदीसाठी माेठी गर्दी केली हाेती़.  बाजारात काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे चित्र हाेते़. 
राज्यभरात काेराेनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे, राज्य शासनाने पाच टप्प्यांमध्ये अनलाॅक प्रक्रिया सुरू केली आहे़ पाॅझिटीव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेनुसर बुलडाणा जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या टप्प्यात झाला आहे़  त्यामुळे, ७ जूनपासून शहरासह ग्रामीण भागातील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे़  अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी शहरातील मुख्य मार्गावर बाजार भरला हाेता़ गत काही महिन्यांपासून बंद असलेली दुकाने सुरू करण्यात आली हाेती.  नागरिकांनी खरेदीसाठी एकच गर्दी केल्याने काेराेनाविषयक नियमांचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र हाेते. 

व्यावसायिकांना दिलासा 
काेराेना संसर्ग वाढल्यामुळे केशकर्तनालये, ब्युटी पार्लर तसेच जीवनाश्यक वस्तू व्यतिरिक्त दुकानेही बंद करण्यात आली हाेती़ त्यामुळे, व्यावसायिकांवर माेठे आर्थिक संकट काेळसले हाेते़ अनलाॅक प्रक्रियेंतर्गत सर्वच दुकाने सुरू करण्यात  आल्याने या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.  काेराेनाविषयक नियमांचे पालन करण्याचे आव्हान राहणार आहे. 

Web Title: Crowds erupted in Buldana on the first day of the unlock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.