कडक निर्बंधामुळे बाजारात उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:54+5:302021-05-11T04:36:54+5:30

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या ...

Crowds erupted in the market due to strict restrictions | कडक निर्बंधामुळे बाजारात उसळली गर्दी

कडक निर्बंधामुळे बाजारात उसळली गर्दी

Next

बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस माेठ्या प्रमाणात वाढतच आहे़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मे च्या रात्री आठ वाजल्यापासून ते २० मे पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहे़ या निर्बंधांना सुरुवात हाेण्यापूर्वीची साेमवारी सकाळी बाजारपेठेत नागरिकांनी एकच गर्दी केली़ शहरातील पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी रांगा लावल्या हाेत्या़ नागरिकांची हाेत असलेली गर्दी पाहून प्रशासनाने किराणा दुकान व भाजीपाला विक्रीस दुपारी चार वाजेपर्यंत मुभा दिली हाेती़

जिल्ह्यात काेराेना संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ काेराेना रुग्णांची संख्या ७० हजारांवर गेली आहे़ तसेच मृत्यूची संख्या ४८१ वर पाेहोचली आहे़ शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत १५ एप्रिलपासून संचारबंदीसह इतर निर्बंध लादले आहेत़ सकाळी ७ ते ११ दरम्यान जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करण्यास परवानगी देण्यात आली हाेती़ या वेळेत बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात माेठ्या प्रमाणात गर्दी हाेत हाेती़ त्यामुळे काेराेनाची साखळी तुटण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले़ वाढता काेराेना संसर्ग राेखण्यासाठी १० मेच्या रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ जीवनाश्यक वस्तूंची केवळ हाेम डिलिव्हरी सुरू राहणार आहे़ नियमांचे पालन केल्यास नागरिकांची निर्बंधातून सुटका हाेणार आहे़ अन्यथा निर्बंधात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही़

प्रशासनाचे वरातीमागून घाेडे

जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश रविवारी काढले़ साेमवारी रात्री आठ वाजल्यापासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले हाेते़ त्यामुळे, १० मे राेजी बुलडाणा शहरासह जिल्हाभरात किराणा दुकान, पेट्रोल पंप आणि भाजीपाला दुकानांवर नागरिकांनी माेठ्या प्रमाणात गर्दी केली़ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी ७ ते ११ या वेळेतच मुभा असल्याने ही गर्दी झाली़ त्यानंतर साडेबारा वाजता प्रशासनाने किराणा दुकाने आणि भाजीपाला विक्री सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सुधारित आदेश काढले़ हेच आदेश रविवारी काढले असते तर नागरिकांची गर्दी झाली नसती़ प्रशासनाचे आदेश येईपर्यंत अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा भाजीपाला व फळे मिळेल त्या भावात विकले हाेते़ तसेच काहींनी फेकून दिले हाेते़ प्रशासनाच्या नियाेजनशून्य कारभारामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनाही त्रास सहन करावा लागला़

नगरपालिकेची पथके स्थापन

११ मे पासून बुलडाणा शहरात कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत़ तसेच पाेलीस प्रशासनही संचारबंदीचे पालन करण्यासाठी चाेख बंदाेबस्त ठेवणार आहे़ त्यामुळे, नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे़

Web Title: Crowds erupted in the market due to strict restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.