लाेणारच्या भाजी मंडीत उसळली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:55+5:302021-04-16T04:34:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लोणार : काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणार : काेराेनाचा संसर्ग माेठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य शासनाने १५ एप्रिलपासून राज्यभरात संचारबंदी लागू केली आहे़ तसेच जमावबंदीसह इतर निर्बंध लादण्यात आले आहेत़. मात्र, संचारबंदीच्या पहिल्याच दिवशी लाेणारच्या भाजी मंडीत सकाळपासूनच भाजीपाला खरेदीसाठी व्यापारी व खरेदीदारांनी गर्दी केली होती. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता़.
राज्यात १४ एप्रिलपासून निर्बंध लावण्यात आले. संध्याकाळी ८ वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत १४४ कलम लागू करण्यात आले. गुरुवारी संचारबंदी असतानाही भाजी मंडीत मात्र शेकडो नागरिकांनी भाजीपाला खरेदीसाठी गर्दी केली होती. यावेळी लाॅकडाऊन, जमावबंदी कायदा तसेच फिजिकल डिस्टन्स, विनामास्कचा फज्जा उडाल्याचे चित्र हाेते़. स्थानिक प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याची गरज आहे.
लाेणारमध्ये ४५० ॲक्टिव्ह रुग्ण
लोणार शहरात व तालुक्यात सध्या कोरोनाचे ४५० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कोविड सेंटरचे व्यवस्थापक डाॅ़. भास्कर मापारी यांनी दिली. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली लक्षणीय वाढ पाहता, प्रशासनाने कोरोना नियमांचे खुलेआम होणारे उल्लंघन गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.