पेट्रोल पंपावर उसळली वाहनधारकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:36 AM2021-05-11T04:36:43+5:302021-05-11T04:36:43+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी एस.राममृर्ती यांनी १० मे राेजीच्या रात्री रात्री ८ वाजेपासून ...

Crowds of motorists thronged the petrol pump | पेट्रोल पंपावर उसळली वाहनधारकांची गर्दी

पेट्रोल पंपावर उसळली वाहनधारकांची गर्दी

Next

बुलडाणा जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधिताची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी एस.राममृर्ती यांनी १० मे राेजीच्या रात्री रात्री ८ वाजेपासून २० मे रोजी ८ वाजेपर्यंत कडक निर्बंध लावण्याचे आदेश पारीत केले.त्यामुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती.

या आदेशानुसार कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक आणि वैद्यकीय कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास पूर्णता बंदी रहाणार आहे़ सर्व प्रकारची दुकाने बंद रहाणार असल्याने तसेच पेट्रोल पंपही शहरातील / नागरी भागातील व हायवे वरील सर्व पेट्रोल पंप हे सामान्य नागरिकांसाठी बंद राहणार आहेत़ त्यामुळे साेमवारी सकाळपासूनच दुचाकी -चारचाकी वाहनधारकांनी पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी एकच गर्दी केली होती. शहरात आजसकाळपासूनच किराणा दुकानावरही खरेदीसाठी गर्दी केली होती. शहरात ठिकठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.

Web Title: Crowds of motorists thronged the petrol pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.