जनावरांची निर्दयतेने वाहतूक; पाच जनावरांसह वाहन ताब्यात
By अनिल गवई | Published: December 6, 2023 02:20 PM2023-12-06T14:20:30+5:302023-12-06T14:44:55+5:30
सजनपुरी चौफुलीवरील घटना: पावणेतीन लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त
खामगाव: एका मालवाहू वाहनात पाच जनावंरांची कोंबून वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी रात्री उघडकीस आला. त्यामुळे शिवाजी नगर पोलीसांनी वाहनासह त्यातील पाचही जनावरे ताब्यात घेतली. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई मंगळवारी रात्री करण्यात आली.
याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोहेकॉ रतन जंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, एका मालवाहू वाहनातून चार ते पाच गोवंशाची निर्दयतेने वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती शिवाजी नगर पोलीसांना मिळाली. या माहितीच्या आधारे सापळा रचून शिवाजी नगर पोलीसांनी एमएच २९ बीई ३३०७ या संशयीत वाहनाची तपासणी केली असता, तीन आठ ते दहा वर्षांचे गोवंश, एक पाच ते सहा वर्षांचा गोवंश आणि एक तीन ते चार वर्षांचा गोवंश अशा पाच गोवंशाची निर्दयतेने वाहतूक सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. तसेच जनावरांना निर्दयतेने वागणूक दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला. या तक्रारीवरून मोहम्मद जाहीर प्यार मोहम्मद ४२ रा.गोंधनापूर ता.खामगांव, ह.मु.गैबी नगर, नांदुरा जि.बुलढाणा आणि अब्दुल आतीक अब्दुल आजीज ३२ वर्ष रा. जुनाफैल, खामगांव या दोघांविरोधात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतीबंध करणे बाबत अधिनियम १९६० कलम ११(1)(क)(घ)(ड)(च)(ज)(ट) (झ)सहकलम ११९ म.पो.का प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पाच गोवंशासह दोन लाखांचा मालवाहू ऑटो जप्त करण्यात आला. पुढील तपास शिवाजी नगर करीत आहेत.