फळधारणेपूर्वीच शेंगांना करपा
By Admin | Published: September 11, 2014 12:19 AM2014-09-11T00:19:56+5:302014-09-11T00:38:54+5:30
मेहकर तालुक्यातील सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे.
मेहकर : तालुक्यातील रायपूर शिवारातील सोयाबीन पिकाच्या शेंगांना फळधारणेपूर्वीच करपा रोगाने ग्रासले असल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. यामुळे रायपूर शिवारातील बर्याच शे तकर्यांचे सोयाबीन पीक धोक्यात सापडले आहे.
यावर्षी निसर्गाचे संपूर्ण चक्रच बदलले दिसत असून, तब्बल एक महिना उशीराने मान्सुनचे आगमन झाले. मात्र तालुक्यातील रायपूर येथील ज्या शेतकर्यांकडे पाण्याची व्यवस्था होती अशा अनेक शेतकर्यांनी १५ जूनला सोयाबीनचा पेरा केला.
मात्र सोयाबीन पीकावर स्पोडोप्टेरा लिट्युरा या किडींचा व कर पा सारख्या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनच्या उत्पादनात घट येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतातूर झाला असून, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.